महेश कुलकर्णी
सोलापूर : महाराष्ट्रात आढळणाºया कर्करुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण तंबाखू-गुटख्याचे सेवन करीत असल्याचे आढळून आले आहे. जगात ११० कोटी नागरिक तंबाखूचे सेवन व धूम्रपान करतात. त्यातील ३० कोटी एकट्या भारतातील आहेत. भारतात दरवर्षी १ लाख ५० हजार महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाची लागण होते. त्यातील ८५ हजार महिलांना प्राण गमवावे लागते. महाराष्ट्रात आढळून येणाºया कर्करुग्ण महिलांमध्ये ६२ टक्के महिलांना गर्भाशयाचा कर्करोग आहे. सोलापुरातील ५० टक्के कर्करोगाचे रुग्ण हे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत असल्याचा वैद्यकीय अहवाल आहे.
तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या वेष्टनावरील ८५% भागात तंबाखू चघळणे, आरोग्यास धोकादायक आहे, असा इशारा दिलेला असतानाही तंबाखू खाणाºयांची संख्या वाढतच आहे. कॅन्सर होण्यासाठी तंबाखू हा अतिशय घातक आणि कारणीभूत ठरणारा पदार्थ आहे. तंबाखू वापरणाºयांपैकी ५० टक्के लोक तंबाखूच्या वापरामुळे मरतात. महाराष्ट्रात ४२ टक्के पुरुष व १९ टक्के स्त्रिया तंबाखूचा वापर करतात. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये याचे जास्त प्रमाण असून वयाच्या आठव्या वर्षापासून मुले तंबाखू सेवन करतात, असा निष्कर्ष समोर आला आहे. शहरी भागातील १ टक्का महिला तंबाखू सेवन करताना तर ग्रामीण भागात हे प्रमाण २ टक्के आहे.
जगभरात तंबाखूच्या वापरामुळे ६० लाख लोक दरवर्षी मरतात. यापैकी ५४ लाख लोक हे तंबाखूच्या प्रत्यक्ष वापरामुळे मरतात. ६ लाख लोक दुसºया व्यक्तीने केलेल्या धूम्रपानामुळे वातावरणात सोडलेल्या धुराचा प्रवेश त्यांच्या शरीरात झाल्यामुळे मरतात. जगभरात सुमारे १०० कोटी लोक तंबाखूचा वापर करतात. यापैकी जवळपास ८० कोटी लोक गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशात राहतात. १३ ते १५ वर्षे वयोगटातील १४ टक्क्यांपेक्षा जास्त मुले तंबाखूचे सेवन करतात. तंबाखूचे व्यसन असणारे लोक सरासरी आयुष्य जगून होण्याच्या आधीच मरतात. तंबाखूमुळे तोंडाचा, घशाचा आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. विडी, सिगारेट, मावा, खैनी, गुटखा या कोणत्याही प्रकारातील तंबाखू आरोग्यास धोकादायक आहे.
तंबाखूचे व्यसन बंद केल्याने कॅन्सर होण्याचे थांबत नाही, आजार बरा होण्यासाठी ८ ते १० वर्षे लागतात. तंबाखू खाण्याने शरीरातील जेनरीकमध्ये बदल झालेला असतो़ ते पुन्हा पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो. आवाज बदलणे, वजन कमी होणे, भूक न लागणे, खोकल्यातून रक्त बाहेर पडणे, तोंडात न भरणारी जखम होणे, न दुखणारी जखम होणे, एखादी न दुखणारी गाठ वाढणे, अनैसर्गिक रक्तस्राव होणे आदी तंबाखूतून झालेल्या कॅन्सरची लक्षणे आहेत.
सोलापुरात दरमहा अडीच लाख किलो तंबाखूचा वापर- सोलापुरात विड्या तयार करण्याचा अत्यंत मोठा उद्योग आहे. या उद्योगावर सुमारे ६० हजार कामगारांची विशेषत: महिला विडी कामगारांची गुजराण होते. शहरात तयार होणाºया विड्यांच्या २३ ब्रँडमध्ये दरमहा २.५० लाख किलो तंबाखूचा वापर होतो.
गुटखाबंदीनंतरही दरमहा एक कोटीची विक्री- महाराष्टÑ शासनाने गुटखाबंदी केली; पण गुटखा चघळण्याचे प्रमाण कमी झाले नाही. बंदीतूनही पळवाट शोधून गुटखा उत्पादकांनी स्वतंत्र सुपारी आणि तंबाखू पाऊच बाजारात आणली आहेत. त्याशिवाय गुटख्याच्या पुड्यांचीही खुलेआम विक्री चौकाचौकात होते. बंदीतही दरमहा एक कोटी रुपयांच्या गुटख्याची विक्री होत असल्याचे बाजारपेठेतून नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगण्यात आले.
३० टक्के लोकांना तोंडाचा कॅन्सर- तंबाखूमुळे ३० टक्के लोकांना तोंडाचा कॅन्सर असतो. तंबाखूचे व्यसन जगभरात वाढत आहे. विशेषत: शाळा, कॉलेजातील विद्यार्थी व कारखान्यांत काम करणारे तरुण कामगार यांच्यात हे प्रमाण वाढत आहे. तंबाखूमुळे श्वसनाचे विकार व हृदयरोग होण्याची शक्यताही वाढते. गर्भवती महिलांनी धूम्रपान केल्यास कमी वजनाच्या बाळाला जन्म देतात किंवा प्रसंगी त्यांचा गर्भपातही होऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणी सिगारेट ओढून सोडलेला धूर शेजारी असलेल्या व्यक्तीच्या शरीरात गेल्यास त्यालाही कॅन्सर होऊ शकतो़ इतका धोका तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून मानवी शरीरास होऊ शकतो.
तंबाखूच्या धुरातील घटक- चार हजारांहून अधिक रासायनिक घटक आहेत. यामध्ये मुख्यत्वे अमोनिया, निकोटीन, इथेनॉल, अॅसिटोन, फेनॉल्स, स्टियरिक अॅसिड, कार्बन मोनॉक्साईड, नॅपथॅलीन, व्हिनाईल, क्लोराईड, नायट्रो बेन्झीन, ब्यूटेन 4 अॅसिटेक अॅसिड, टाल्यूएन, मिथेन, हायड्रोजन सायनाईड, कॅडमियम, फॉरमॅलीन, अर्सोनिक, डीडीटी.
कर्करोगपूर्व लक्षणे४तोंडात पांढरा चट्टा किंवा तांबडा वेलवेटसारखा दिसणारा चट्टा४तोंडात आग होण्यासारख्या संवेदना, तोंड उघडण्यास त्रास होणे, तोंड पूर्ण न उघडता येणे, जिभेच्या हालचालीस होणारा अडथळातोंडाच्या कर्करोगाची प्रमुख लक्षणे४दोन आठवड्यात न भरून येणारी ओठावरील, हिरड्यांवरील, तोंडाच्या आतील तसेच जिभेवरील जखम४तोंडाचा काही भाग बधिर होणे४तोंडात किंवा घशात दुखणे४तोंड पूर्ण न उघडता येणे४मानेवर, तोंडात, गालाच्या आतील भागावर, जिभेवर किंवा ओठावर सूज अथवा गाठप्रतिबंध ४प्रत्येकाने आरशामध्ये पाहून आपल्या तोंडाची स्थिती तपासून पाहणे. नमूद केलेल्या लक्षणांपैकी कुठलेही लक्षण दिसल्यास त्वरित दंतरोग तज्ज्ञाकडे जावे४कुठल्याही प्रकारचे तंबाखूचे व्यसन टाळणे४तंबाखू सेवन करणाºयास अटकाव करणे किंवा तसे शक्य नसल्यास त्याचा वापर कमी करण्यास भाग पाडणे४मौखिक स्वच्छता राखणे, समतोल आहार घेणे.उपचार४‘एफ. एन. ए. सी.’ आणि बायोप्सी या तपासणीद्वारे कर्करोग निदान करता येते. शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी, केमोथेरपी यासारख्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. प्राथमिक स्थितीत निदान झाल्यास रुग्णांचे आयुष्य वाढण्यास मदत होते. महत्त्वाचे म्हणजे ‘प्रतिबंध हे उपचारापेक्षा सरस ठरते’.