आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३० : ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला महादीपोत्सव कर्णिकनगर येथील स्वातंत्र्यसैनिक नगरातील मैदानावर सोमवारपासून सुरू होत आहे. सहा दिवस चालणाºया या सोहळ्यात भव्य शिवमंदिराची प्रतिकृती उभी करण्यात आली असून उद्घाटन तेलंगणाचे जलसंपदामंत्री टी. हरीष राव यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता होणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली़विविध धार्मिक सोहळ्यांसाठी सोलापूर प्रसिद्ध आहे. त्या अनुषंगाने एक भव्यदिव्य धार्मिक सोहळा साजरा करण्याच्या उद्देशाने हा महादीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ओम चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक मूर्तीकार राजू गुंडला यांनी हैदराबाद येथील दीपोत्सव सजावट करण्याचे काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापुरातही असा सोहळा करण्याची कल्पना सुचली. यातून ही कल्पना साकारली. यामध्ये ४०० ते ६०० फूट लांबी-रुंदी असणारे मंदिर उभारण्यात आले आहे. हे काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. रविवारी हे काम पूर्ण झाले असून सोमवारपासून हा महोत्सव सुरू होणार आहे. दररोज दोन लाख दीप या ठिकाणी लावण्यात येणार असून सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत हा कार्यक्रम असणार आहे. या पत्रकार परिषदेस ट्रस्टचे संस्थापक राजू गुंडला, अध्यक्ष रविकांत दलसिंगे, उपाध्यक्ष सदानंद पिस्कार, सचिव विजय महिंद्रकर, हरिदास बुटला, प्रवीण मुटकिरी आदी उपस्थित होते.-----------------------------धार्मिक कार्यक्रम आणि प्रवचनया महोत्सवात सहा दिवस दररोज कल्याणोत्सव (पालखी)चा कार्यक्रम होणार आहे. ३० आॅक्टोबर - गणपती कल्याणोत्सव. प्रवचन - श्री शिवाचार्य जयसिद्धेश्वर स्वामीजी, डॉ. श्री शिवाचार्य मल्लिकार्जुन स्वामी, ३१ आॅक्टोबर - विठ्ठल-रुक्मिणी कल्याणोत्सव, प्रवचन - माता शिवानंद सरस्वती (विजयवाडा), आंध्रप्रदेश, १ नोव्हेंबर - लक्ष्मीनारायण कल्याणोत्सव, प्रवचन - सुधाकर इंगळे महाराज, २ नोव्हेंबर - सीताराम कल्याणोत्सव - प्रवचन - डॉ. शिवाचार्य मल्लिकार्जुन महास्वामी, ३ नोव्हेंबर - बालाजी - पद्मावती लक्ष्मी कल्याणोत्सव, प्रवचन - पवनजी परदेशी, ४ नोव्हेंबर - शिव-पार्वती कल्याणोत्सव, प्रवचन - जगद्गुरू श्री चंद्रशेखर स्वामी (काशी पीठ)-------------------------असे असणार मंदिर- २००० चौरस फुटावर उभे राहणार मंदिर - ४०० फूट रुंद, ६०० फूट लांब - भोवती ४० फूट उंच डोंगर - ४५ फूट उंच लिंग आणि शिवमूर्ती- ८ बाय १२ फुटाचा नंदी - २५ फूट उंच शिवलिंग - डावीकडे आणि उजवीकडे मिळून १३६ छोटी मंदिरे - उजवीकडच्या मंदिरात ६८ लिंगांची स्थापना - डावीकडील मंदिरात सर्व देवदेवतांची स्थापना - दिवे लावण्यासाठी ४ बाय ८ फूट साईजचे ४०० टेबल - प्रत्येक टेबलवर एक असे ४०० लिंग - गुहेसारख्या तीन प्रवेशद्वारावर १० फुटी उंच सहा हत्ती
आजपासून सोलापुरात लक्ष महादीपोत्सव, रोज दोन लाख दिवे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:18 AM
ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला महादीपोत्सव कर्णिकनगर येथील स्वातंत्र्यसैनिक नगरातील मैदानावर सोमवारपासून सुरू होत आहे.
ठळक मुद्देभव्य शिवमंदिराची प्रतिकृती उभी करण्यात आली महादीपोत्सव कर्णिकनगर येथील स्वातंत्र्यसैनिक नगरातील मैदानावरदररोज दोन लाख दीप या ठिकाणी लावण्यात येणार