सोलापूर : बुधवार २६ मे २०२१ रोजी खग्रास चंद्रग्रहण असून भारताच्या अति पूर्वेकडील ईशान्य भागातून हे ग्रहण खंडग्रास दिसणार आहे. महाराष्ट्रासह उर्वरित भारतामध्ये ग्रहण दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादि कोणतेही नियम कोणीही पाळू नयेत, असे आवाहन दाते पंचांगतर्फे करण्यात आले आहे.
उर्वरित भारतामध्ये कोठेही हे ग्रहण दिसणार नाही. भारतातील ग्रहण दिसणाऱ्या भागातून ग्रहणाचा स्पर्श, मध्य दिसणार नसून संध्याकाळी ६:२३ वाजता फक्त ग्रहण मोक्ष दिसणार आहे. ओरिसातील पुरी, भुवनेश्वर, कटक, बालासोर, पश्चिम बंगालमधील कोलकाता, जलपायगुडी, सिलिगुडी, संपूर्ण अंदमान निकोबार बेटे, आसाम, मिझोराम, मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश व मणिपूर इ. प्रदेशात खंडग्रास ग्रहण दिसणार आहे. महाराष्ट्रासह उर्वरित भारतामध्ये ग्रहण दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादि कोणतेही नियम कोणीही पाळू नयेत असे आवाहन दाते पंचांगकर्ते यांनी केले आहे.