आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि १७ : वषार्नुवर्षे उघड्यावर जाणची सवय बदलताना "टॉयलेट एक प्रेमकथा" या चित्रपटाने आज अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांना भुरळ घातली. बिवी वापस आये ना आये, गाव मे शौचालय वापस आयेगे... राधे राधे...! या अक्षय कुमार च्या डीॅयलॉग ने अनेकांना केलेल्या प्रयत्नाचे सार्थक झाल्या सारखे वाटले.सोलापूर जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परीषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षच्या माध्यमातून नवनवीन कल्पना , संकल्पना राबविण्याचा प्रयत्न करीत आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज गुरुवारी दि. १७ आॅगस्ट रोजी सोलापूर येथे हागणदारीमुक्ती वर आधारीत टॉयलेट प्रेमकथा. या चित्रपटाचा विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती मल्लीकार्जून पाटील,माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, माळशिरस पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे, विजय लोंढे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य नकाते, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, पशुसंवर्धन अधिकारी किरण पराग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितल जाधव यांचेसह पंचायत समिती सदस्य, ५४० ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सर्व विभागाची अधिकारी व कर्मचारी यांचेसह ९८० जण उपस्थित होते.-------------------सरपंचाना देखील फिल्म दाखविणार ! - डॉ. भारूडमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड म्हणाले , जिल्ह्यातील हागणदारी मुक्त गावांचे ग्रामसेवक , जिल्हा परीषदेचे अधिकारी , अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांच्यासाठी आयोजित केला होता. हागणदारी मुक्त गावात देखील स्व्चछतेचे सातत्य कायम रहावे हा फिल्म दाखविण्याचा उद्देश आहे. दर शुक्रवारी देशात एक फिल्म येतो. परंतू "टॉयलेट एक प्रेम कहाणी" हा आगळावेगळा चित्रपट आहे. शौचालयासाठी किती संघर्ष करावा लागतो. विचार बदलण्याची प्रेरणा मिळते. सर्वांना जरूर पहावा. स्वच्छता ही सवय आहे. जिल्ह्यातील राहिलेली शौचालये पुर्ण करण्याचे बळ निश्चित यामुळे मिळेल.
टॉयलेट एक प्रेमकथा चित्रपटाने घातली सोलापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाºयांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 6:51 PM