: पालवण, ता. माढा येथे शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास अचानकपणे अवकाळी वादळ सुटून परिसरातील झाडेझुडपे, विविध प्रकारच्या बागा मुळासह उपटून पडल्या. त्यामध्ये आंबा, नारळ, केळी, अशोक, भोकर अशा विविध झाडांचे मोठे नुकसान झाले.
वादळी वा-यात उमाजी मदने यांच्या घरावरचे पत्रे उडून २३००० रुपयांचे नुकसान झाले. बाजीराव क्षीरसागर यांच्या केळीची ५४ झाडे पडून २२ हजार रुपयांचे नुकसान झाले. किरण क्षीरसागर यांची ४०० केळीची झाडे पडून सुमारे १५ हजार रुपये नुकसान, तर बालाजी जयसिंग क्षीरसागर यांची ३०० च्या आसपास झाडे पडून १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. हनुमंत पवार यांची ७० झाडे वाकडी होऊन २९ हजार रुपये तर सुधीर क्षीरसागर यांची ३० गुंठे मका भुईसपाट होऊन २१,५०० रुपयांचे नुकसान झाले. आंब्याची ३ झाडे पडून ९,५०० रूपये नुकसान झाले आहे.
आदिकराव साळुंखे यांचे २ एकर क्षेत्रातील अंदाजे कलिंगड ३५ टनांचे २ लाख ४५००० रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे गावात ऐन कोरोनाच्या महामारीत या पावसामुळे न भरून निघणारे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तरी, शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो
०९पालवण०१
०९पालवण०२
०९पालवण०३