याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी करण अभिमान इंगोले याच्यावर भादंवि कलम ३७६ अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी मामाकडे शिकण्यासाठी होती. ती इयत्ता ११ वीत शिकत असताना तिची वर्गातील करण अभिमान इंगोले याच्याशी ओळख झाली. कालांतराने ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पंढरपूर (भाळवणी) व वेळापूर (ता. माळशिरस) येथील लॉजवर नेऊन वेळोवेळी अत्याचार केले. यामध्ये ती अल्पवयीन शाळकरी मुलगी गरोदर राहिली. पीडितेने त्यास हा प्रकार सांगितला असता त्याने तिला गर्भनिरोधक गोळ्या आणून देतो म्हणून सांगितले. मात्र, दिल्याच नाहीत. त्यानंतर तिने घडला प्रकार आईला सांगितला. माय-लेकींनी सरकारी रुग्णालयात तपासणी केली असता पीडिता चार महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले.