बार्शी : चहाची कॅन्टीन चालविणाऱ्या एका महिलेशी ओळख वाढवून तिच्यावर अत्याचार केला. तसेच घर खरेदीसाठी दिलेले १३ लाख रुपये परत देण्याचे टाळाटाळ करुन फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलिसांनी धनराज मेरगू याच्या विरोधात गुन्हा नोंदला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार डिसेंबर २०१८ मध्ये पीडित महिला ही चहा कॅन्टीन चालवीत असताना धनराजची बचत गटाच्या माध्यमातून तिची ओळख झाली. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. प्रारंभी तिने याला विरोधही केला. परंतु स्वत:ला कोणाचाही आधार नसल्याने होकार दिला. यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसांनी तिने त्याला घर घेऊन देण्याची मागणी केली. यावर त्याने दोघांनी निम्मे-निम्मे पैसे भरण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने बचत गटाचे कर्ज व मुद्रा लोण काढून १३ लाख रुपये दिले. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार करुन वाच्यता न करण्याचे धमकावले.
डिसेंबर २०२० मध्ये फोन करताच पैसे घेऊन येतो म्हणून गेला. त्यानंतर तो पुन्हा या महिलेकडे येऊन ‘तू मला पैसे मागायचे नाही मला त्रास दिल्यास तुला व घरच्यांना सोडणार नाही’ असे धमकावले. या पमकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करत आहेत.