निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या अधिपत्याखाली निवडणूक प्रक्रिया सुरू असून सोमवारी (दि. १५) उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज वैध ठरल्याने सर्वांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. आता केवळ बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा बाकी आहे.
सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर सार्थ विश्वास ठेवून ही निवडणूक बिनविरोध केली आहे. यासाठी सर्वच पक्षांनी बहुमोल सहकार्य केले. कारखान्याने सभासद शेतकरी व संचालक मंडळाच्या सहकार्याने अल्पावधीत देशात नावलौकिक मिळवलेला आहे. कारखान्याची गाळप क्षमता अडीच हजार मे. टनांवरून ११ हजार मे. टन, डिस्टलरी प्रकल्प ३० केएलपीडीवरून १५० केएलपीडी को.जन प्रकल्प क्षमता ७.५ नेटवरून ३८ मे. वेट, रिफाईन शुगर प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यान्वित झाले असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.
राज्यात सर्वांत जास्त गाळप
चालू गाळप हंगामात कारखान्याने सरासरी ११.१० साखर उताऱ्याप्रमाणे १३.५२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. १४ लाख मे. टन उसाचे गाळप होईल असा अंदाज वर्तविला; तर युनिट-२ या कारखान्याने ३.७१ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. या हंगामात राज्यात सर्वाधिक गाळप झाले असून, सभासद, बिगर सभासद अशा सर्वांच्या उसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही. कुणाचा ऊस राहिला असल्यास संपर्क साधावा, असे आवाहनही आमदार शिंदे यांनी केले आहे.
उसाची सर्व बिले अदा
कारखान्याने आतापर्यंत गाळप झालेल्या ३१ जानेवारीपर्यंतचे प्रतिटन २ हजार १०० प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. कामगारांची मजुरीही वेळेवर होत आहे, असे आमदार शिंदे यांनी स्पष्ट करताना साखर वेळेवर विक्री होत नसल्याने केंद्र शासनाने वेळीच योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत, असेही सांगितले.
----