सर्वात मोठी पांगरी ग्रामपंचायतीत दुरंगी लढत होत आहे. उपळेदुमाला आणि उपळाई ठोंगे या १३ सदस्यसंख्या असलेल्या गावात सोपल - राऊत यांच्या गटासोबतच तिसरी आघाडी मैदानात उतरल्याने येथे तिरंगी लढत होत आहे. आगळगावात आमदार राऊत यांचा एका गटाने गाव पातळीवर सोपल गटाशी हातमिळवणी करून राऊत गटाच्या विरोधातच दंड थोपटले.
मळेगावात चाळीस वर्षात प्रथमच निवडणूक लागली आहे. याठिकाणी विद्यमान सरपंच गुणवंत मुंढे यांच्या पॅनलला पंचायत समिती सदस्य राजाभाऊ धोत्रे यांनी कडवे आव्हान दिले. चारेमध्ये जगदाळे आणि पाटील पॅनलमध्ये, तर श्रीपत पिंपरीमध्ये भारत ताकभाते व बाळराजे पाटील यांच्या पॅनलला कनय्या पाटील व बाळासाहेब काकडे यांच्या पॅनलचे आव्हान आहे. याठिकाणी दोन्ही गटांनी तालुका पातळीवरील राजकारण न पाहता सोयीने आघाड्या केल्या आहेत. धामणगाव दुमाला, शेळगाव आर येथे दुरंगी लढत होत आहे. खांडवीमध्ये ११ जागांसाठी तिरंगी लढत होत आहे.
१७ गावे बिनविरोध
बार्शी तालुक्यातील खडकलगाव, भोयरे, मंंगशी आर., पिंपळगाव पा., पिंपळगाव दे., जामगाव पा, जहानपूर, खामगाव, मालवंडी, रातंजन, सर्जापूर, हळुदुगे, धोत्रे, धामणगाव आ., शेलगाव व्हळे, कापशी या गावांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
दडशिंगे, बळेवाडी, सावरगावात केवळ एका जागेसाठी निवडणूक
सावरगाव का. मध्ये ७ पैकी ५ जागा या बिनविरोध झाल्या, तर एका जागेसाठी अर्ज दाखल झाला नाही आणि एका जागेसाठीच निवडणूक लागली आहे. बळेवाडीमध्ये आणि दडशिंगेमध्ये येथे सात पैकी सहा जागा बिनविरोध झाल्याने एका जागेसाठी निवडणूक लागली आहे.
तालुक्यातील बिनविरोध सदस्य
कव्हे, तावडी, कांदलगाव, यावली, पिंपरी आर, बावी, पांढरी, नांदणी, शिराळे, नागोबाचीवाडी व साकत या गावातील प्रत्येकी एक तर झरेगाव -३, सौंदरे -५, वाणेवाडी-४, पांगरी-६, हिंगणी पा- ४, खडकोणी-२, गाताचीवाडी-३ या गावांतील वरील जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित जागांसाठी निवडणूक लागली आहे.