सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेचे माजी संचालक व सोलापूर जाहिरात संघटनेचे अध्यक्ष महेश अंदेली यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आज दुपारी १ वाजून ४५ वाजता अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून ते अश्विनी रुग्णालयात उपचार घेत होते.
महेश अंदेली यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत अनेक वर्ष कार्य केले. गेली अनेक वर्षे ते प्रसार माध्यमात कार्यरत आहेत. जाहिरात क्षेत्राशी संबंधित संघटनेची स्थापना त्यांनी केली. या संघटनेचे ते प्रमुख पदाधिकारी होते. स्व. वि.गु. शिवदारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सहकारात काम सुरू केले. सोलापूर जनता सहकारी बँकेचे ते संचालक होते.
राजशेखर शिवदारे यांच्यासोबत सिद्धेश्वर सहकारी बँक , सोलापूर जिल्हा सहकारी ग्राहक भांडार या संस्थांमध्ये अनेक वर्षे कार्य केले. जिल्हा ग्राहक भांडाराचे पंधरा वर्षे संचालक, व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले. सध्या या संस्थेचे चेअरमन आहेत. अत्यंत प्रेमळ, सर्वांशी मिळून मिसळून वागण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्वांचे मित्र अशी त्यांची ओळख आहे.