यावेळी डॉ. शिवलीला माळी यांनी हायवेवर अपघात झाला की जखमींवर कसा प्राथमिक उपचार करायचा या संदर्भात सविस्तर माहिती व प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी डॉ. रविकांत माने, आरोग्य साहाय्यिका सुनीता रावडे, आरोग्यसेवक नागनाथ होटकर, परिचर संतोष पवार, पंडित व्हनमाने, आरोग्यसेविका संगीता ढंगे, सरोजा तोळणुरे व आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी वागदरी येथील मृत्युंजय दूत म्हणून चिदानंद परीट, बसवराज कलशेट्टी, विजयकुमार शिंदे, शिवानंद पुरंतशरण शिंगे यांची नेमणूक करण्यात आली. सांगवीसाठी प्रवीणकुमार बाबर, जाकीर कागदे, रवी राठोड, अप्पाराव भोसले, पिंटू चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे.
२५ अक्कलकोट-मृत्युंजय दूत
अक्कलकोट तालुक्यातील सांगवी, वागदरी येथील मृत्युंजय दूतांना प्रशिक्षण देताना डॉ. शिवलीला माळी, पोलीस कर्मचारी, आदी दिसत आहेत.