सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून नीरज डोहरे हे रूजू झाले आहेत.
दरम्यान, नीरज डोहरे यांनी ११ ऑक्टोबर २०२२ रोजी मंडल रेल प्रबंधक सोलापूर म्हणून पदभार स्वीकारला. यांचे शिक्षण वर्ष १९९१ मध्ये H.B.T.I कानपूर मधून यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये बीटेक (B.Tech.) झाले असून दिनांक ३० नवेंबर १९९२ रोजी इंडियन रेल्वे स्टोअर सर्व्हिस (IRSS) सेवेत रेल्वेत रुजू झाले.
सोलापुरला येण्यापुर्वी त्यांनी मुख्यालय, मध्य रेल्वे, मुंबई येथे जून 2019 ते 10 ऑक्टोम्बर 2022 पर्यंत मुख्य साहित्य व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन, नवी मुंबई मध्ये ही काम केले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (IIPA), नवी दिल्ली येथून 2017-2018 मध्ये लोक प्रशासनात पदव्युत्तर पदविका केली आहे. जानेवारी 2015 ते जून 2017 या कालावधीत रेल्वे बोर्ड, रेल भवन, नवी दिल्ली येथे संचालक, रेल्वे स्टोअर्स इन्व्हेंटरी कंट्रोल मध्ये ही काम केले. पश्चिम रेल्वे मध्ये 2003 ते 2014 या कालावधीत विविध पदांवर उप मुख्य साहित्य व्यवस्थापक काम केले. पूर्वोत्तर रेल्वे, गोरखपूर येथे सप्टेंबर 1997 ते सप्टेंबर 2001 पर्यंत 4 वर्षे दक्षता अधिकारी म्हणून काम केले. 1994 ते 1996 पर्यंत बंगळुरू जवळील कृष्णराजपुरम डिझेल शेडमध्ये दक्षिण पश्चिम रेल्वे (पूर्वी दक्षिण रेल्वे) मध्ये स्टोअर्सचे सहायक नियंत्रक म्हणून काम केले. यांना साहित्य खरेदी, भंगार विक्री आणि स्टोअर्स डेपो व्यवस्थापनाचा विस्तृत अनुभव आहे .
त्यांनी दौंड - मनमाड विभागाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण वेळेत पूर्ण करणे तसेच प्रवाशांच्या सुविधांशी संबंधित कामांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. तिकीट तपासणी कमाई आणि गूड्स लोडिंग इत्यादि ला प्राथमिकता दिले जाईल असे सांगितले.