मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार राजकुमार ढोबळे (पंढरपूर ग्रामीण), दत्तात्रय तोंडले (पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन), पोलीस नाईक वर्षा बंडगर (पंढरपूर ग्रामीण), भोजलिंग भोसले (करकंब), पोलीस शिपाई नागनाथ गायकवाड (पोलीस मुख्यालय) आदी कर्मचाऱ्यांच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी प्रशासकीय बदलीचे आदेश काढले आहेत.
यापूर्वी महिला पोलीस नाईक अंबाक्का कोष्टी, पोलीस हवालदार दत्तात्रय तोंडले, पोलीस नाईक वंदना अहिरे या तिघांना तत्कालीन डीवायएसपी दत्तात्रय पाटील यांच्या कार्यकाळात सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. मुदत संपल्याने दोन कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. बदली झालेल्या एका पाेलीस हवालदाराला माेठ्या चाैकशीकामी साेलापूर पाेलीस मुख्यालयाला ॲटच करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मोहोळ येथून महिला पोलीस हवालदार शबनम शेख या नव्याने मंगळवेढा पोलीस ठाण्याकडे दाखल झाल्या आहेत.