सोलापूर : राज्यातील १५ उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाºयांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. यात सोलापूर जिल्ह्यातील पाच उपजिल्हाधिकाºयांचा समावेश आहे़ याबाबतचा आदेश उपसचिव डॉ़ माधव वीर यांच्या सहीने निघाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील भूसंपादन क्रमांक १ चे उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे यांची उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक १ सोलापूर या रिक्त पदावर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्रेहल भोसले यांची उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक २६ पुणे या निता सावंत यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर, जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांची जिल्हा पुनर्वसन अधिकारी, पुणे या भारत वाघमारे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांची उपविभागीय अधिकारी खेड-राजगुरूनगर या पदावर बदली करण्यात आली आहे.
याशिवाय भूसंपादन क्रमांक ७ चे उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी यांची उपविभागीय अधिकारी माण-खटाव येथे बदली झाली आहे़ आता पुण्याहून आलेले भारत वाघमारे हे उपजिल्हा निवडणूक अधिकारी या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत, शिवाय सातारा येथील डॉ़ रेखा साळुंखे या उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक १ या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.