सोलापूर - मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्याबाबतचे परिपत्रक नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. दरम्यान, परिपत्रकानुसार रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकपदी एल. के. रणयेवले यांची तर तर वरिष्ठ परिचलन व्यवस्थापकपदी प्रदीप हिरडे यांची नियुक्ती करण्यात आली. दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला.
एल. के. रणयेवले हे सोलापूर विभागात एप्रिल २०२१ पासून वरिष्ठ परिचालन प्रबंधक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कारकिर्दीत, विभागात वाडी – दौंड या रेल्वे मार्गावर विद्युतीकरण तथा दुहेरीकरण हें प्रमुख कार्य केले. किसान रेलचे ६६४ ट्रीप परिचलन करून १, ५६, १०६ टनेजचे परिवहन केले, त्यामुळे रेल्वेला ६९.९ कोटी रुपये नफा झाला, हा एक सोलापूर विभागाचा ऐतिहासिक पार्सल परिवहनाचा उच्चांक आहे. मालवाहतूक लोडिंगमध्ये दिलेल्या टार्गेट पूर्ण केले. याशिवाय उसाची मळी, गायी आणि त्यांचे वासरू (पशुधन), ऑटोमोबाईलमध्ये एकूण १७ रॅक चे परिवहन केले. याशिवाय प्रदीप हिरडे यांनीही सोलापूर विभागात वरिष्ठ वाणिज्य पदावर असताना अनेक उल्लेखनीय कामगिरी केली.