सोलापूर : राज्यातील पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी रात्री उशिरा करण्यात आल्या. यात सोलापुरातील सहाय्यक पोलीस आयुक्तासह उपविभागीय पेालीस अधिकारी, सोलापूर ग्रामीणमधील पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अवर सचिव स्वप्निल बोरसे यांच्या सहीने शासनाचे आदेश काढण्यात आले आहेत.
सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातून बाहेर गेलेले पोलीस अधिकारी
- माधव ज्ञानोबा रेड्डी - सहाय्यक पोलीस आयुक्त ते उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा, नांदेड,
- विशाल शामराव हिरे - उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा ते सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड,
- विक्रम रमाकांत कदम - उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग ते उपविभागीय पोलीस अधिकारी, कळवण, नाशिक ग्रामीण,
बाहेरील जिल्ह्यातून सोलापुरात येणारे अधिकारी
- राजू धोंडीराम मोरे - उपविभागीय पोलीस अधिकारी, परतूर उपविभाग, जि. जालना ते सहाय्यक पेालीस आयुक्त, सोलापूर शहर,
- अर्जुन नरसिंग भोसले - उपविभागीय पोलीस अधिकारी, नाशिक ग्रामीण ते उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग,
- अजित भगवान पाटील - उपविभागीय पोलीस अधिकारी, अहमदनगर ग्रामीण ते उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा,