शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

माझ्यातील परिवर्तनाची गोष्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 2:32 PM

स्वत:साठी किंवा आपल्या कुटुंबासाठीच जगण्याऐवजी संपूर्ण समाजासाठी जगावे.

अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या दुसºया सत्रात शिकत असताना मी अभियांत्रिकीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. पण घरातून विरोध झाल्यामुळे मी नाईलाजाने नावडत्या विषयांचाही अभ्यास चालू ठेवला आणि अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.

अभियांत्रिकीच्या शिक्षणाने जरी माझी घुसमट वाढवली होती, तरी त्या शिक्षणाने चांगला पगार देणारी एक नोकरी मात्र मला मिळवून दिली. या नोकरी दरम्यान मी कोल्हापुरात केलेल्या एका वर्षाच्या वास्तव्याने माझ्या जीवनाला एक महत्त्वपूर्ण कलाटणी दिली !या काळात आॅफिस संपल्यानंतर संध्याकाळी मी माझ्या बॅचलर सहकाºयांसह टेबल टेनिस, कॅरम इ. खेळ खेळत असे, तर कधी फेरफटका मारायला शहरात जात असे. असा फेरफटका मारताना अधूनमधून आम्ही संध्याकाळच्या काही व्याख्यानमालांना मी हजेरी लावली. या काळात कोल्हापूर महानगरपालिकेच्या आवारातील व आजूबाजूच्या परिसरातील अनेक व्याख्याने आम्ही ऐकली. यातील तीन व्याख्याने मला आजही पुसटशी आठवतात. यातील एक होते ते म्हणजे डॉ. तारा भवाळकर यांचे़, दुसरे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे आणि तिसरे डॉ. गंगाधर पानतावणे यांचे! 

डॉ. तारा भवाळकर त्यांच्या व्याख्यानात म्हणाल्या होत्या की, आज आपण साजरा करत असलेल्या अनेक सणांचा आपल्या धर्माशी तसा अर्थाअर्थी काही संबंध नाही. अनेक सण हे मुळातील लोकोत्सव आहेत व ते धर्म ही संकल्पना अस्तित्वात येण्याच्या आधीपासून साजरे केले जात आहेत. माझ्यासाठी हा नवा विचार होता. 

प्राचार्य शिवाजीराव भोसले भारतातील महामानवांविषयी बोलताना म्हणाले होते की, तुम्हीही तुमच्या आयुष्यातील दहा वर्षे समाजासाठी बाजूला काढून ठेवा; म्हणजे तुमचाही इतिहास लिहिताना मला खूप आनंद वाटेल! भोसले सरांचे हे विधान माझ्या काळजात कोरले गेले. डॉ. पानतावणे यांनी त्यांच्या व्याख्यानातून महात्मा फुले यांनी केलेल्या समाजकार्याची माहिती दिली होती. त्या माहितीनेही मी मोठ्या प्रमाणात प्रभावित झालो.

ही आणि अशी व्याख्याने ऐकताना माझ्या मनात विचारांची मोठमोठी वादळे निर्माण होऊ लागली. मला वाटू लागले की, आपण अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन एक अधिकारी तर झालो; पण आजही आपल्या समाजाशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टींची, त्याच्या समस्यांची, त्याच्या दैनंदिन संघर्षाची आपल्याला काहीच माहिती नाही. हे योग्य नाही. हे सर्व आपण जाणून घेतलेच पाहिजे!यानंतरचे सुमारे वर्षभर रात्र रात्र जागून मी अनेक पुस्तके वाचून काढली. या वाचनात प्रामुख्याने महामानवांच्या जीवनचरित्रांचा समावेश होता.

१९९८ च्या त्या वर्षभरात कोल्हापूरच्या करवीर नगर वाचनालयातील सुमारे ३० पुस्तके मी वाचून काढली. त्यामध्ये महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अब्राहम लिंकन, विन्सस्टन चर्चिल इ. पराक्रमी पुरुषांबरोबरच अ‍ॅडॉल्फ हिटलर सारख्या जगप्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनचरित्रांचाही समावेश होता. या वाचनापूर्वी मी जगलेले आयुष्य यानंतर मला अगदीच सुमार दर्जाचे वाटू लागले. त्यामुळे त्यानंतरच्या १५-२० वर्षांच्या काळातही डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, मदर तेरेसा, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, गौतम बुद्ध, सम्राट अशोक या आणि अशा अनेक महामानवांचे  चरित्रग्रंथ मी मोठ्या आवडीने वाचून काढले.

 या सर्व पुस्तकांच्या वाचनामुळे माझ्या जीवनाला एक वेगळेच वळण लागले! आता केवळ स्वत:साठी किंवा आपल्या कुटुंबासाठीच जगण्याऐवजी संपूर्ण समाजासाठी जगावे,असे मला तीव्रतेने वाटत आहे. माझ्यातील या सर्व परिवर्तनाचे श्रेय मी ऐकलेल्या व्याख्यानांना  आणि त्यानंतर केलेल्या वाचनालाच जाते!

- डॉ. रविनंद होवाळ(लेखक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा