सोलापूर: माल वाहतूक व्यवसायातील वाहतूकदार, ठेकेदार, बुकिंग एजंट, दलाल, वाहतूक कंपनी, कागदपत्रे, पाकिटे, मालाची पोहोच करणाºया कुरिअर कंपनीला आता व्यवसाय करण्यासाठी आरटीओकडे नोंदणी असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रत्येक शहरात बाजारपेठ, मार्केट यार्डमध्ये मालाची ने-आण करण्यासाठी अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्या कार्यरत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून या कंपन्या कमिशनवर कार्यरत आहेत. त्याचबरोबर बसस्थानक व स्टेशन परिसरात ट्रॅव्हल्सचे तिकीट बुकिंग करणारे दलाल, एजंट व कंपनीची कार्यालये थाटली गेली आहेत. या सर्व व्यवहारांची नोंद आतापर्यंत होत नव्हती. ज्याप्रमाणे रिक्षा व ट्रॅव्हल्सच्या भाड्यावर आरटीओचे नियंत्रण असते त्याप्रमाणे मालवाहतूक करणाºया वाहनांवर कोणतेही निर्बंध नाहीत. पण आता केंद्र शासनाने यापूर्वी संमत झालेला कायदा अंमलात आणला आहे.
कॅरेज बाय रोड अधिनियम २00७ च्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने २८ फेब्रुवारी रोजी नियम २0११ अन्वये अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून हा नियम लागू झाला आहे.
मालाची साठवणूक करणारे, वितरक, माल जमा करणारे, व्यावसायिक यांना कॉमन कॅरिअर म्हणून क्षेत्रीय नोंदणी प्राधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे अर्ज करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्ट चालक, मालक, दलाल, एजंट व कुरिअर कंपन्यांनी तातडीने आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून ३१ मेच्या आत नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा परिवहन आयुक्तांनी दिला आहे.
सार्वजनिक बसला जीपीएसच्केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियमात सुधारणा करून नियम १२५ (एच) प्रमाणे १ एप्रिलनंतर बाजारात येणाºया सार्वजनिक वाहतूक करणाºया प्रवासी वाहनांना जीपीआरएस (लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस) व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक केले आहे. याबाबत वाढीव मुदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता नव्याने बाजारात येणाºया बसना हा नियम लागू होणार आहे.
केंद्र शासनाच्या कॅरेज बाय रोड अॅक्ट २00७ व कॅरेज बाय रोड नियम २0११ अंतर्गत शहरातील ट्रान्सपोर्ट चालक, मालक व कुरिअर कंपनीच्या चालकांनी आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. तसे आदेश परिवहन आयुक्तांकडून आले आहेत. या नियमाची अंमलबजावणी सुरू आहे. - बजरंग खरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी