आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि. 28 :- गतिमान आणि सुलभ कामकाजासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे कामकाज यापुढे सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) मधून होणार आहे. सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात १८९ केंद्र असून वाहन चालक परवान्याच्या कोणत्याही कामासाठी अर्ज करण्यासाठी सीएससी केंद्रावरुनच अर्ज आणि शुल्क भरुन कार्यालयात सादर करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी आज येथे केले.देशातील सर्व मोटार वाहन विभागाच्या कार्यालयाचे कामकाज आॅनलाईन पध्दतीने व्हावे यासाठी केंद्र सरकारने वेबसाईट तयार केली आहे. याबाबतचे प्रशिक्षण आणि कार्यशाळा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात आयोजित करण्यातील आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर, मोटार वाहन निरीक्षक सचिन बुरुड, कॉमन सर्व्हिस सेंटरचे प्रमुख प्रकाश बसव्वा आदी उपस्थित होते.पुढे बोलताना खरमाटे यांनी सांगितले की, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन नोंदणी आणि परवाना याबाबतच्या कामकाजासाठी वेबसाईटवरील वाहन ४.० आणि सारथी ४.० या प्रणालीचा वापर सुरु झाला आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात वाहन ४.० या प्रणालीवर वाहन हस्तांतरण, पनर्नोंदणी, वाहनावरील बोजा चढवणे, उतरवणे या सुविधा उपलब्ध होतील. सीएससी मध्ये अर्जदारांकडून विहीत शुल्काव्यतिरिक्त प्रति कामकाजासाठी वीस रुपये शुल्क आकारले जाणार आहे.वीस रुपयांपेक्षा जास्त मागणी केल्यास १८००३०००३४६८या क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. सोलापूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात १८९ सीएससी असून या केंद्राची माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे, अशी माहितीही खरमाटे यांनी दिली.-------------------सारथी प्रणालीवर हे कामकाज होणाऱ़़शिकाऊ अनज्ञप्ती साठी, अनुज्ञप्तीसाठी स्लॉट बुकिंग करणे, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी लागणारी कागदपत्रे स्कॅनिंग करुन अपलोड करणे, शिकाऊ अनुज्ञप्तीचा अर्ज करणे,आॅनलाईन फी भरणे, पक्क्या अनुज्ञप्तीसाठी, पक्क्या अनुज्ञप्तीसाठी स्लॉट बुकिंग करणे, पक्क्या अनुज्ञप्तीसाठी लागणारी कागदपत्रे स्कॅनिंग करुन अपलोड करणे,शिकाऊ अनुज्ञप्ती चा अर्ज करणे,आॅनलाईन फी भरणे,अनुज्ञप्ती नुतनीकरणाचा अर्ज करणे,अनुज्ञप्तीच्या दुय्यम प्रतीसाठी अर्ज करणे, अनुज्ञप्तीवरील पत्ता बदलणे, वाहन ४.० प्रणाली वाहन नोंदणीच्या कामकाजाशी निगडीत असून प्रणालीवर पुढीलप्रमाणे कामकाज होते़ याशिवाय वाहन नोंदणीसाठी अर्ज करणे, वाहनाच्या पसंती क्रमांकासाठी आॅनलाईन फी भरणे,वाहनाचा आॅनलाईन कर भरणे, वाहन नोंदणी शुल्क आॅनलाईन भरणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे़
परिवहन कार्यालयाचे कामकाज आता कॉमन सर्व्हिस सेंटर मधून : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची माहिती
By admin | Published: April 28, 2017 6:13 PM