शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

आलिशान गाडीतून हातभट्टी दारूची वाहतूक; राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली जप्त

By संताजी शिंदे | Published: March 08, 2024 7:49 PM

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत हातभट्टी दारू प्रकरणी एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सोलापूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत हातभट्टी दारू प्रकरणी एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान एका आलीशान गाडीतून जाणारी दारूही जप्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्प विभागाने गुरूवार व शुक्रवार या दोन दिवसात मोहिम राबविण्यात आली. सोलापूर-तुळजापूर रोडवर एका अलिशान गाडीतून बाराशे लिटर तर जिल्हाभरात हातभट्टी व विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत.  मोहिमेत निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सोलापूर-तुळजापूर रोडवरील गंगेवाडी (ता. उत्तर सोलापूर) परिसरात बोलेरो जीप (क्र. एमएच-१२ जीके-४४२७) आडवून तपासणी केली. त्यात १० रबरी ट्यूबमध्ये अंदाजे बाराशे लिटर हातभट्टी दारू आढळून आली. या प्रकरणी समर्थ मोहन पवार(वय-२४) कोंडीबा शिवाजी राठोड (वय ४७) या दोघांना अटक केली. कारवाईत जीपसह सहा लाख ६१ हजार रूपये किंमतीचा माल जप्त केला. 

दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे यांच्या पथकाने सोलापूर शहरातील पोटफाडी चौक येथे अजय तुकाराम राठोड (वय-२४ रा. मुळेगाव तांडा) हा इसम त्याच्या दुचाकी वाहन (क्र. एमएच-१३ डीएच-४३१३) वरून दोन रबरी ट्यूब मध्ये १६० लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याकडुन ६८ हजार २०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने मोटारासयकल (क्र. एमएच-१३ डीएन-९३६८) वरून १६० लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले. या कारवाईत एक इसम वाहन जागीच सोडून फरार झाला. सांगोला दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले यांनी मंगळवेढा शहराच्या हद्दीतील मंगळवेढा- मरवडे रोडवरील पेट्रोल पंपासमोर सायबण्णा सिद्धाराम पाटील (वय-२६) त्याच्या हिरो होंडा स्प्लेंडर (क्र.एमएच-१० सीएच- ८३८८) विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याकडून ६६ हजार ५७० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. असे जिल्ह्यात एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले. हि विशेष मोहित राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

टॅग्स :Solapurसोलापूर