यावेळी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. सुशांत चव्हाण, खजिनदार सदानंद गरड, पप्पू चव्हाण, ऋषीकेश गव्हाणे, ज्ञानेश्वर वायकुळे, ऋषिकेश डोंगळे, सुदर्शन हांडे, दयानंद धुमाळ, रोहित डोंगळे, सोनू नवले, भय्या राऊत आदी उपस्थित होते.
प्रतिष्ठानच्या वतीने आजवर हांडे गल्ली, बार्शी न्यायालय परिसर, स्व.अर्जुनराव बरबोले व्यापारी संकुल परिसर, पाटील प्लॉट मार्ग आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्याची निगा राखली आहे.
वटपौर्णिमा हा हिंदू सण आपल्याला निसर्गपूजक असले पाहिजे हा बोध देतो. यामुळेच आजच्या दिवशी शेकडो वर्ष टिकणारे वड हे झाड लावले असून भविष्यात त्याची योग्य ती निगा राखली जाईल, तसेच ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल तिथे आणखी इतर रोपांची लागवड केली जाईल, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. सुशांत चव्हाण यांनी सांगितले.
----
===Photopath===
240621\1838-img-20210624-wa0025.jpg
===Caption===
वटपौर्णिमा निमित्त युवा प्रतिष्ठानच्या वतीने पाटील प्लॉट येथे वृक्षारोपण