कुसळंब : गावात हिरवळ आणि ऑक्सिजन वाढावे म्हणून येथील स्मशानभूमीत १०१ वृक्षांची लागवड करण्यात आली.
ग्रामपंचायत व मॉर्निंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मॉर्निंग फाउंडेशनचे अध्यक्ष विजय राऊत यांच्या हस्ते वृक्षलागवडीचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेत गुलमोहर, करंज, आवळा, तुळस अशा विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी सरपंच गंगुबाई जगताप, उपसरपंच विष्णू आवटे, ग्रामसेवक रणजीत माळवे, बाळासाहेब जगताप, बाळासाहेब जाधव, तुकाराम गडदे, मेजर गुणवंत खुरुंगळे, धनंजय जवळकोटे, विठ्ठल चित्राव, शंकर लटके, सचिन आवटे, समाधान पाटील, महेश कराळे, दीपक मुंडे, नितीन थोरबोले, शिवकुमार शिंदे, प्रवीण गायकवाड, अमोल मुळे, अनिल कोरेकर, संजय धारूरकर, विनोद कदम, अमोल धायगुडे, हरी मुकटे, अमर ठोंबरे, आदित्य जगताप, बालाजी कागदे, ऋषी महाराज, विनोद मस्के, शंकर कागदे, गणेश कागदे, पांडुरंग यादव, राजाभाऊ आडसूळ, प्रकाश आडसूळ, दादा कुठे, बबन नन्नवरे उपस्थित होते.