अनगर : येथील शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात माजी आमदार राजन पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व एक पद एक वृक्ष या शासनाच्या उपक्रमाअंतर्गत १०० केशर आंब्याचे वृक्षारोपण करण्यात आले. शाळा परिसरात वड, करंजी, चिंच या वृक्षांचे वृक्षारोपण करून प्रत्येक शिक्षक व कर्मचारी यांना घरी लावण्यासाठी केशर आंब्याचे कलमी रोप देण्यात आले.
वृक्षारोपणासाठी प्राचार्य चंद्रकांत ढोले, उपप्राचार्य सीताराम बोराडे, पर्यवेक्षक शिवाजी मोटे, चंद्रकांत यावलकर, महादेव खरात, महादेव चोपडे, संभाजी बोडके, संजय डोंगरे, चंद्रकांत सरक, कार्यक्रमाधिकारी पांडुरंग शिंदे, रमेश चव्हाण, दाजी गुंड, विलास पासले, परमेश्वर थिटे, अनुपमा वरवटकर,बजरंग पाचपुंड, सोमनाथ ढोले उपस्थित होते. वृक्षारोपणासाठी शहाजी थिटे, महादेव भडकवाड, तानाजी उघडे, चिमाजी कुंभार, संजय राऊत, राजू भांगिरे यांनी परिश्रम घेतले.
---
फोटो : ०४ अनगर
अनगर येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण करताना