शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

झाडं कोसळली, रस्ते खचले, मैैदानावर साचलं पाणी

By appasaheb.patil | Published: June 25, 2019 12:38 PM

सोलापूर शहरात १६.७ मि.मी. पावसाची नोंद; घरावर वीज कोसळली, विद्युत ताराही तुटल्या, महापालिकेच्या अधिकाºयांनी केली पाहणी

ठळक मुद्देसोलापूर शहरात झालेल्या जोरदार पावसाने अनेक सखल भागात पाणी थांबलेसोलापूर शहरात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ते कामांसाठी खोदाई सुरू, या खोदाई केलेल्या खड्ड्यात पाणी साचले

सोलापूर : सोलापूर शहर आणि परिसरात रविवारी रात्रीपासून झालेल्या आर्द्रा नक्षत्राच्या जोरदार पावसामुळे शहराचे हाल बेहाल झाले. अनेक रस्ते खचल्यामुळे वाहनांची चाकं रूतून पडली. झाडं कोसळून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शिवाय सखल भाग आणि होम मैदानासह अनेक मैदानांवर अक्षरश: तळ्यासारखे पाणी साचले. राजस्वनगरात एका घरावर वीज कोसळली. विजेचे लोळ वेगाने घरात घुसून घराच्या भिंतीला आणि कपाटाला तडे गेले. सोमवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत १६.०७ मी. मी. पावसाची नोंद झाली.

सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण दिसून येत होते़ दिवसभरात केव्हाही पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती़ दरम्यान, चार वाजण्याच्या सुमारास विडी घरकुल परिसरात पावसाने हजेरी लावली़ त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास महापालिका परिसर, आसरा चौक, सात रस्ता, कुमठा नाका, अशोक चौक, डफरीन चौक, रेल्वे लाईन आदी भागांत पावसाने हजेरी लावली. 

कुमार चौक फॉरेस्ट येथील नागरिकांच्या घरात पावसामुळे नाल्याचे पाणी शिरले़ या परिसरातील लोक आपला जीव मुठीत धरून चिखलातून मार्ग काढत आहेत़ याबाबतची माहिती नगरसेविका फुलारे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना देताच तत्काळ आ़ शिंदे यांनी या भागाची पाहणी करून महापालिका अधिकाºयांना सूचना केल्या.

यावेळी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका वैष्णवी करगुळे, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे, जॉन फुलारे, अमोल खोत, प्रशांत महागावकर, बबलू गवळी, किशोर राशीनकर, आश्विन मुळे, सुभाष वाघमारे आदी उपस्थित होते़  यावेळी त्यांनी पावसामुळे कोणत्या घरात पाणी घुसून नुकसान झाले आहे का ? याची पाहणी केली.

वीज कोसळल्याने घबराट- विजापूर रोडच्या पलिकडे असलेल्या राजस्वनगरात रविवारी रात्री सर्व झोपी गेले असताना विजेचे संकट ओढावले. अचानक मोठा आवाज आला. त्यामुळे सर्वच जण जागे झाले. काय झाले हे पाहण्यासाठी परिसरातील रहिवासी घराबाहेर आले. तेव्हा घरातील ट्यूब लाईटच्या उंचीचं आणि त्यासारखीच चमक असलेली वीज लपकून खाली आली. तेथे ती कुरमुटे यांच्या घरामध्ये घुसली. यामुळे कुरमुटे यांच्या घराच्या भिंतीला तडे गेले. शिवाय तेथेच असलेल्या लोखंडी कपाटावर मोठा आघात झाला. यामुळे कपाटाच्या काही भागावर जळाल्याचे डाग पडले. सुदैवाने कोणतीही जीवित व मालमत्तेची मोठी हानी झाली नाही.

महापालिकेच्या अधिकाºयांनी केली पाहणी- सोलापूर शहरात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ते कामांसाठी खोदाई सुरू आहे़ या खोदाई केलेल्या खड्ड्यात पाणी साचले आहे़ त्यामुळे सोमवारी स्मार्ट सिटीच्या कामांना ब्रेक लागला़ प्रभाग क्ऱ १५ अ येथील कुमार चौक, फॉरेस्ट, चांदणी चौक, तुराट गल्ली, मौलाली बावडी, काडादी चाळ, हुंडेकरी चाळ या ठिकाणी खूप दिवसांपासून स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे़ या कामामुळे या परिसरात जेसीबीच्या सहाय्याने खड्डे करण्यात आले आहेत़ त्यामुळे रात्री पडलेल्या पावसामुळे या भागात चिखल झाला असून, वाहनधारकांना याचा त्रास होत आहे़ सकाळपासून अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत़ पावसामुळे पुढील परिणाम लक्षात घेऊन या प्रभागाच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी तत्काळ महानगरपालिकेचे झोन अधिकारी व कामगार कल्याण आरोग्य जनसंपर्क अधिकारी कांबळे, झोनचे इंजिनिअर बागवान यांना बोलावून घेऊन येथील परिस्थिती दाखविली़ लवकरात लवकर रस्त्यावरील चिखल काढून नागरिकांना येण्या-जाण्यास रस्ता करून द्यावा, असे अधिकाºयांनी संबंधित कर्मचाºयांना सूचना केल्या़ 

गाड्यांचे झाले नुकसाऩ़़- रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे विनय हौसिंग सोसायटी, विजापूर रोड येथील एक झाड टाटा इंडिगो (क्रमांक नंबर एमएच १३ एसी १९३०) वाहनावर पडले़ या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही़ मात्र गाडीचे नुकसान झाले़ या घटनेमुळे या मार्गावरील रस्ता पूर्णपणे बंद झाला होता़ त्यामुळे शाळकरी, नोकरदार वर्गातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागला़ याशिवाय एमएच १३ सीए ५५२६ व अन्य एका टमटमचे नुकसान झाले आहे़ 

फांद्या, तारा तुटल्याने वाहतुकीस अडथळा..- सोलापूर शहरात झालेल्या जोरदार पावसाने अनेक सखल भागात पाणी थांबले आहे़ त्यामुळे सोमवारी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत होती़ या पावसामुळे अनेक ठिकाणी सायंकाळी झाडं व फांद्या तसेच महावितरणच्या विद्युत तारा तुटून पडल्याच्या घटना घडल्या आहेत़ यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

सोलापुरात दोन दिवसात ५३.५ मि.मी. पाऊस..- सोलापूर शहर आणि परिसरात शनिवार व रविवार या दोन दिवसात जोरदार पाऊस झाला. या पावसाची नोंद ५३.५ मि.मी. इतकी नोंदण्या झाल्या. याशिवाय जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ तालुक्यांमध्ये आर्द्रा नक्षत्राचा दमदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसdroughtदुष्काळTemperatureतापमान