सोमवारी दुपारी खूपसे-पाटील व प्रहार औद्योगिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हे दोघे टेंभुर्णीहून सोलापूरकडे निघाले असता काही नागरिकांनी खड्ड्यामुळे होणारा त्रास व वाहतुकीची कोंडीबाबत माहिती दिली. संबंधितांकडे अनेक वेळा तक्रार करूनही कोणी दखल घेत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यासाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अतुल खूपसे पाटील यांनी अचानक खड्ड्यात झाडे लावा आंदोलनाचा निर्णय घेतला. अचानक आंदोलन केल्यामुळे प्रशासनाचीही धावपळ झाली तसेच काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
या वेळी प्रहार औद्योगिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे, जिल्हा युवा सेनेचे सरचिटणीस दत्तात्रय गोरे, विठ्ठल मस्के, जनहित शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष किरण भांगे, राजाभाऊ खटके, दत्ता कोल्हे, योगेश नाळे, गणेश खोटे, अतुल माने, विशाल सुरवसे आदी या झाडे लावा आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
-----
दोन दिवसांत रस्ता दुरुस्तीचे आश्वासन
आंदोलन चालू असतानाच महामार्ग प्राधिकरण सोलापूर विभागाचे अधिकारी संजय कदम यांनी खूपसे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला व दोन दिवसांत रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
----
फोटो : १९ टेंभुर्णी
ओळी - रोडवरील खड्ड्यात झाडे लावून आंदोलन करताना अतुल खूपसे पाटील, अमोल जगदाळे व कार्यकर्ते.
---