कुरुल : आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर भीमा सहकारी साखर कारखाना साईटवर शोकसभा पार पडली. भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष सतीश जगताप, संचालक अनिल गवळी, रामहरी रणदिवे, बापू चव्हाण, बिभीषण वाघ, राजेंद्र टेकळे, चंद्रसेन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी धनंजय महाडिक म्हणाले, भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक म्हणाले, राज्यातील सहकारी साखर कारखाने अडचणीत आले होते. त्यावेळी राज्य सरकारकडे कारखानदारांचे प्रश्न मांडण्यासाठी या टीमचे कॅप्टन म्हणून आमदार भारत भालके यांनी भूमिका घेतली होती. त्यांच्या निधनाने भीमा परिवाराचे कुटुंबप्रमुख गेले. भालके यांच्या अकाली निधनाने भीमा, विठ्ठल परिवार व पंढरपूर, मंगळवेढा तालुका पोरका झाला आहे. ते सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने सर्वच कारखान्यांसमोरील समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असायचे. भीमाच्या विस्तारीकरण व वीजनिर्मिती प्रकल्प उभारणीत भालके यांचे मोठे योगदान आहे.
यावेळी सिद्राम मदने, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, भारत पाटील, संजय यादव, संग्राम चव्हाण, जाकीर मुलाणी उपस्थित होते.
----
फोटो : ०२ कुरुल
भारत भालके यांच्या प्रतिमेचे पूजन करताना धनंजय महाडिक, उपाध्यक्ष सतीश जगताप व संचालक मंडळ.