शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

सोलापूर जिल्ह्यात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर सुसाट अन् ट्रॉली मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 3:31 PM

आप्पासाहेब पाटील  सोलापूर : प्रमाणापेक्षा जादा ऊस... विनापासिंग ट्रॉलीचा वापऱ वाहतूक नियमांचे उल्लंघऩ़़ पुरेशा खबरदारीचा अभाव़़़ शिकाऊ ट्रॅक्टर चालकांकडून सदोष ...

ठळक मुद्देऊस वाहतूक रस्त्यावरून धावणाºया अन्य वाहन चालकांच्या जीवावरऊस वाहतूक करणाºया वाहतुकीचा प्रश्न शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ऐरणीवरसोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांच्या गाळप हंगामास सुरूवात

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : प्रमाणापेक्षा जादा ऊस... विनापासिंग ट्रॉलीचा वापऱ वाहतूक नियमांचे उल्लंघऩ़़ पुरेशा खबरदारीचा अभाव़़़ शिकाऊ ट्रॅक्टर चालकांकडून सदोष वाहतूक... अशा एक ना अनेक कारणांमुळे ऊस वाहतूक करणाºया वाहतुकीचा प्रश्न शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ऐरणीवर आला आहे. सदोष पद्धतीने सुरू असणारी ऊस वाहतूक रस्त्यावरून धावणाºया अन्य वाहन चालकांच्या जीवावर उठल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे़ त्यामुळे अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांच्या गाळप हंगामास सुरूवात झाली आहे़ जिल्ह्यात यंदा ३२ साखर कारखाने सुरू आहेत़ त्यापैकी बहुतांश साखर कारखाने सोलापूर शहराच्या परिसरात आहेत़ हंगाम जोमात असून, रस्त्यावर ऊस वाहून नेणाºया ट्रॅक्टरची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणाºया ट्रॉली असलेल्या ट्रॅक्टर व ट्रक यांना शहरातून मार्ग काढत उसाची वाहतूक करावी लागत आहे़ त्यामुळे शहरातील अपघातांचे प्रमाण व वाहतुकीच्या खेळखंडोबाच्या घटना सातत्याने वाढत आहेत़ एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास त्या मार्गावरील वाहतूक ठप्प होते शिवाय ट्रॉली पलटी झाल्यानंतर ऊस रस्त्यावर तसाच पडून राहतो़ त्यामुळेही वाहतूक विस्कळीत होते़ ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यावर प्रत्येक वर्षी अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होते. मागील वर्षीच्या गाळप हंगामातील केवळ तीन महिन्यांच्या अपघातात १० ते १२ जणांना जीव गमवावा लागला होता. यातून या प्रश्नाचे गांभीर्य समोर येते.

उसाच्या वाहतुकीनुसार ट्रॅक्टर मालकाला कारखान्याकडून भाडे अदा करण्यात येते. यामुळे ट्रॅक्टर चालक क्षमतेपेक्षा अधिक ऊस  भरतात. यासाठी सर्रास दोन ट्रॉलींचा वापर करण्यात येतो. एका ट्रॉलीची क्षमता ४ ते ६ टन इतकी असते. परंतु, यामध्ये ६ ते ८ टन ऊस भरण्यात येतो. नफा कमावण्यासाठी बेकायदेशीरपणे अधिक ऊस भरला जातो. हा प्रकार जीवघेणा ठरत आहे तसेच सर्रास विनापासिंग ट्रॉलींचा वापर करण्यात येतो. ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरच्या अपघातास प्रामुख्याने ट्रॉली कारणीभूत ठरतात.

दुर्घटना वाढल्या...- साखर कारखाना प्रशासनाकडून ऊस वाहतुकीसाठी प्रामुख्याने ट्रॅक्टरला प्राधान्य देण्यात येते. त्याचबरोबर ट्रॅक्टर मालकाकडून कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून ऊस वाहतुकीला प्राधान्य देण्यात येते.  परंतु सदर वाहतूक करताना ट्रॅक्टर चालक व मालकांकडून पुरेशी खबरदारी घेण्यात येत नाही. यामुळे शहरात वारंवार दुर्घटना घडताना दिसतात. 

एका लाईटच्या जोरावर बेफामपणे वाहने धावतात- ट्रॅक्टरला स्वतंत्रपणे ट्रॉली जोडण्यात येते. यामुळे त्यांना इंडिकेटर नसतो. त्याचबरोबर रिफ्लेक्टरदेखील वापरण्यात येत नाही. केवळ एका लाईटच्या जोरावर ट्रॅक्टरचालक बेफामपणे ट्रॅक्टर दामटत असतात. त्यातून अपघात घडून अनेकांचे बळी जातात. त्यामुळे याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

रस्त्याच्या कडेला थांबल्यामुळे अपघात वाढले- ग्रामीण रस्त्यांवर सध्या ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक आदी वाहनांची वर्दळ वाढली आहे. एकीकडे वाहन संख्या वाढलेली असतानाच ऊस वाहतूक करणाºया वाहनांची संख्या वाढल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्त्याकडेला थांबविण्यात आलेली ऊस वाहतूक करणारी वाहने अधिकतर धोकादायक ठरत आहेत.

रस्त्यावरच वाहन पार्किंगमुळे वाढले अपघात...- दिवसभर, रात्री-अपरात्री ही ऊस वाहतूक सुरू असून, वाहनचालक अनेक वेळा रस्त्यावरच वाहन पार्किंग करून जातात. अशा ऊस वाहतूक करणाºया वाहनांना धडक बसून होणारे अपघात वाढताना जीवाला धोका निर्माण होत आहे. राष्ट्रीय महामार्ग सौंदलगा सेवा रस्त्यावर घडलेला अपघात याचेच उदाहरण आहे. असा धोका होऊ नये यासाठी वाहनधारक, कारखानदारांच्या सजगतेची गरज आहे. पण त्याचबरोबर थांबणाºया वाहनांवर तातडीने कारवाई पोलीस प्रशासनाकडून होणे महत्त्वाचे आहे.

 

प्रमाणापेक्षा जादा उसाची वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई सुरू आहे़ मंगळवारी ऊस वाहतूक करणाºया तीन ट्रॅक्टरवर कारवाई करून ही वाहने जप्त करण्यात आली आहेत़ धोकादायक पध्दतीने वाहतूक होणाºया वाहनांवर नक्कीच कारवाई होईल त्या पध्दतीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष पथकाची नियुक्ती करून कारवाई होईल़ त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत़- संजय डोळेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूऱ

सोलापूर शहरातून ऊस वाहतूक करणाºया जड वाहनांबद्दल यापूर्वी कारखानदारांना सूचना दिलेल्या आहेत़ ऊस हा नाशवंत असल्याने शेतकºयांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेत असतो़ मात्र प्रमाणापेक्षा ज्यादा ऊस वाहतूक होत असेल तर यापुढे सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई केली जाईल़ कारखानदार व शेतकºयांनी नियमात राहून ऊस वाहतूक करावी़- वैशाली शिंदे, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक, सोलापूर शहर

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसTrafficवाहतूक कोंडीSugar factoryसाखर कारखाने