चालक दिगंबर विश्वनाथ शिंदे (रा. निडळ, ता. खटाव, जि. सातारा) व अमोल ज्ञानेश्वर घोरफडे (रा. सातारा) असे चोरी करणाऱ्यांची नावे आहेत. याबाबत विजय रामभान दवंगे (३६, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी जिंती गावच्या शिवारातील रेल्वे गेट पूल नं. २६ चा बोगदा दुरुस्त करण्याचे काम चालू केलेले होते. त्या कामाकरीता लागणारे एकूण २० टन ५८० लोखंडी स्टील पुणे येथून घेतले. स्टील घेतलेल्या कुबेर कंपनीने ज्योती ट्रान्सपोर्ट कंपनीकडील माल ट्रक क्रमांक एम. एच. ४६, ए. आर. ६७६१मध्ये भरुन पाठवले. स्टील मोजल्यानंतर कमी भरले. तेव्हा चालक शिंदे याने बरोबर असल्याचे सांगितले. त्यानंतर ट्रक वजनकाटा करण्यासाठी कुरकुंभकडे जाताना रस्त्यातच ट्रकच्या खालील कप्प्यातील डस्टचे पोते खाली करताना आढळले. तेव्हा चालकांना पकडल्यानंतर त्यांनी स्टील चोरीची कबुली दिली. पुढील तपास हवालदार संतोष देवकर हे करीत आहेत.
ट्रक चालकाने स्टील चोरले, वजनासाठी डस्टचे पोते भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:28 AM