ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार नारायण पाटील, बागल गटाच्या रश्मी बागल, माजी आमदार जयवंतराव जगताप आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे पूर्ण ताकदीने उतरणार असल्याची चर्चा आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायत निवडणुका प्रथमच होत आहेत.
सध्यातरी तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक पातळीवर निवडणूक होत आहेत. सध्या पाटील गट, बागल गट, जगताप गट, शिंदे गट अशा प्रकारे गटाने निवडणूक लढविली जात आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींवर याच गटांची सत्ता आहे. करमाळा तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत माजी आमदार नारायण पाटील, बागल गटांच्या नेत्या रश्मी बागल, माजी आमदार जयवंत जगताप आणि आमदार संजय शिंदे हे पूर्ण ताकदीने ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे. चारही गट स्वबळावर निवडणूक लढणार असले तरी गावपातळीवर यामध्ये बदल होऊ शकतो. थंडीच्या वातावरणात गावागावात राजकीय वातावरण तापत चालले आहे.
या गावात होणार निवडणुका
साडे, सालसे, झरे, कोंढे, कुगाव, नेर्ल, केडगाव, हिसरे, आळसुंदे, दिलमेश्वर, पिंपळवाडी, जातेगाव, कोळगाव, जेऊरवाडी, कविटगाव, ढोकरी, फिसरे, रोशेवाडी, कुंभेज, अर्जूननगर, सौंदे, हिवरवाडी, मांगी, मीरगव्हाण, पाडळी, पांडे, पांगरे, पाथुर्डी, पोटेगाव, शेलगाव (क), आळजापूर, श्रीदेवीचामाळ, गुळसडी, वडगाव, पुनवर, देवळाली, शेटफळ, बोरगाव, बिटरगाव, घारगाव, पोथरे, हिवरे, निमगाव, उमरड, सावडी, मलवडी, करंजे, भोसे, सांगवी, सरपडोह या गावांमध्ये निवडणुका होणार आहेत.
-----