तालुक्यात माणगाव झेडपी गटाला द्राक्ष बागेमध्ये विकसित झालेला भाग म्हणून ओळखला जातो. कारण, येथील हवामान द्राक्षचे बेदाणा बनविण्यासाठी पोषक असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळेच येथील शेतकरी सध्या बेदाणा निर्मितीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत.
सध्या द्राक्ष काढण्याचा बहार ६५ टक्के पूर्ण होत आला असून माल थेट पुणे, मुंबई, दिल्ली व आंध्र प्रदेश येथील मुख्य बाजारपेठेत जातो. कच्चा द्राक्षांना प्रतिकिलो सरासरी ३० ते ५० रुपये भाव मिळत आहे. मात्र, द्राक्षपासून बेदाणा निर्माण करून सांगली, तासगाव, सोलापूर, पंढरपूर या बेदाणाच्या मुख्य बाजारपेठेत थेट विक्री केल्यास त्यास प्रतिकिलो १६० ते २४० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे कापसेवाडी येथील द्राक्ष बागायतदार नितीन कापसे यांनी सांगितले आहे.
द्राक्ष बाजारपेठेत विकण्यापेक्षा बेदाणे निर्मिती करून विकल्यास शेतकऱ्यांना शाश्वत नफा मिळतो. येथील शेतकऱ्यांना एकरी द्राक्ष बागेतून बेदाणा ३ ते ५ टन तर बाजारपेठेत विक्री करण्यासाठीचे द्राक्ष १५ ते २० टन या पद्धतीने उत्पादन मिळत आहे. त्यामुळे या द्राक्षबागेत येथील शेतकरी सध्या लखपती होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तरुण शेतकरी द्राक्षबागा लागवडीकडे वळत असल्याचे चित्र आहे.
कोट :::::::::
माझी २५ एकर द्राक्षबाग असून मी दरवर्षी संपूर्ण बेदाणाप्रक्रिया करीत असतो. जेव्हा बाजारात चांगला भाव मिळेल, त्याचवेळी विक्री करतो. त्यामुळे त्यातून मला चांगला नफा मिळतो. माझ्याकडे बेदाणा प्रक्रिया युनिट उपलब्ध आहे. परिसरातून गेल्यावर्षी ३ लाख ४० हजार प्रति १५ किलो बॉक्सप्रमाणे बेदाणा विक्रीसाठी उपलब्ध झाला होता. यंदाही त्यापेक्षा अधिक प्रमाणात उपलब्ध होईल, असा अंदाज आहे.
- नितीन कापसे
,
द्राक्ष बागायतदार, कापसेवाडी
फोटो
०१कुर्डुवाडी-बेदाणा
ओळी
कापसेवाडी येथील द्राक्ष बागायतदार नितीन कापसे यांनी बेदाणा निर्मितीसाठी शेडवर टाकलेले द्राक्ष.