सोलापूर : दिवाळीनंतर चातुर्मासाच्या समाप्तीदिवशी तुळशीचा विवाह सोहळा होणार आहे़ यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे़ पंढरपुरात होणाºया कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानंतरच्या दुसºया दिवशी तुळशीचा विवाह होणार आहे़ तुळशीचा विवाह झाल्यानंतर लग्नाच्या मुहूर्तांनादेखील प्रारंभ होतो़ वरूणराजाला निरोप देताच शिशिराचे आगमन होते़ या आगमनामुळे विवाह सोहळ्याच्या तयारीला सारेच लागतात़ दरम्यान चार महिन्यांच्या काळात देव -देवता निद्रा स्थितीत असतात. देवउठनी एकादशी पार पडल्यानंतरच साºया शुभ मुहूर्ताना सुरूवात होते, असे म्हटले जाते. यंदा तुळशी विवाह सोहळा मंगळवार २० नोव्हेंबर रोजी पासून पोर्णिमेपर्यंत होणार आहे.
तुळशी विवाह कसा करतात ?तुळशी विवाहामध्ये वधूच्या रूपात तुळशीला सजवून तिचा विवाह शाळीग्राम दगडाशी लावण्याची प्रथा आहे. शाळीग्राम हा विष्णू असल्याचं समजलं जातं. काही ठिकाणी घरातील लहान मुलांचा तुळशीसोबात विवाह लावला जातो. याकरिता तुळशीला वधूप्रमाणे सोळा श्रृंगारांनी सजविण्यात येते़ तुळस ही पवित्र आहे़ तुळशीच्या पत्राशिवाय कोणत्याही देवाला दाखविलेला नेवैद्य हा परिपूर्ण होत नाही़ एक-एक तुळशीचा पत्र महत्वाचा आहे.
असा आहे तुळशी विवाह शुभ मुहूर्तद्वादशी तिथी आरंभ : १९ नोव्हेंबर २०१८ दुपारी २:२९ वाजल्यापासूनतुळशीचा विवाह सोहळा शुक्रवार २३ नोव्हेंबर २०१८ या पोर्णिमेपर्यंत सुरू असतो़
तुळशी विवाहाचं महत्त्व काय ?तुळशी विवाह हा हिंदूधर्मियांसाठी एक पवित्र सोहळा समजला जातो. कार्तिकी व्दादशीच्या मुहूर्तावर तुळस आणि विष्णूचा विवाह झाल्याची अख्यायिका आहे. द्वादशीपासून पुढील पाच दिवस हा सोहळा केला जातो. घरामध्ये किमान तुळशीचं रोप असणे आवश्यक आहे. तुळस वातावरणातील अशुद्ध घटक दूर ठेवण्यास मदत करते, ताजा प्राणवायूचा पुरवठा करते. यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहण्यास मदत होते, असा उल्लेख आयुर्वेदात करण्यात आला आहे.
कसे कराल तुळशीचं लग्नतुळशीच्या रोपाची घरात रुजवणी केल्यानंतर सुमारे ३ वर्षांनी तिचा विवाह करण्याची पद्धत आहे. यानंतर तुळशीच्या विवाहादिवशी तुळशीला स्नान घालून तिचे अभिषेक करण्यात येते़ त्यानंतर तिला नववधूप्रमाणे नटवले जाते. त्यामध्ये आवळा, चिंच, बोरं, उसाची दांडी, हळकुंड आणि हिरव्या बांगड्या ठेवल्या जातात. घरात शाळीग्राम दगड असल्यास त्याच्यासोबत किंवा घरातील किशोरवयीन मुलासोबत आंतरपाट धरून मंगलाष्टाकाच्या घोषात तुळशी विवाह संपन्न होतो. यानंतर घरात बेसनाचा लाडू, अनारस, करंज्या, गोडाधोडाच्या पदार्थाचे वाटप केले जाते. त्यानंतर फटाके उडविले जातात- किरण मुरलीधर जोशी, जुने विठ्ठल मंदीर, सोलापूर