शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

सुपर मार्केटस्मुळे किराणा व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 12:27 PM

पन्नास टक्के घट : सरकारच्या धोरणाला व्यापाºयांचा विरोध

ठळक मुद्दे किरकोळ किराणा व्यापाºयांचे कंबरडे पुरते मोडण्याची दाट शक्यता किरकोळ किराणा व्यापार ५० टक्क्यांनी घटला

रवींद्र देशमुखसोलापूर : केंद्र सरकारने थेट परकीय गुंतवणुकीसाठी सिंगल ब्रँडला परवानगी दिल्यानंतर वॉलमार्ट-फ्लिपकार्टच्या संभाव्य कराराच्या पार्श्वभूमीवर देशात अन्नधान्यापासून अनेक उत्पादने एकाच ब्रँडखाली सुपर मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहेत. या स्थितीत किरकोळ किराणा व्यापाºयांचे कंबरडे पुरते मोडण्याची दाट शक्यता आहे; पण सध्या अस्तित्वातील बिग बझार, डी-मार्टसारख्या भारतीय कंपन्यांच्या सुपर मार्केट जाळ्यामुळे किरकोळ किराणा व्यापार ५० टक्क्यांनी घटला असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

बिग बझार ही कंपनी सन २००१ मध्ये भारतात सुरू झाली. फ्यूचर ग्रुप या पॅरेंट आॅर्गनायझेशनच्या या कंपनीचे देशातील १२० शहरात २५० हून अधिक मॉल्स आहेत. किराणा मालापासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी, दागिने आदी वैविध्यपूर्ण उत्पादने बिग बझारच्या सुपर मार्केटस्मध्ये उपलब्ध आहेत. डी-मार्ट ही कंपनी सन २००२ मध्ये सुरू झाली.

या कंपनीच्या सुपर मार्केटमध्येही सर्व प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. महाराष्टÑासह गुजरात, आंध्र, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात या कंपनीचे १५० अधिक मॉल्स आहेत. सोलापूरसारख्या मध्यम आकारमानाच्या शहरामध्ये गेल्या सहा-सात वर्षांपासून या कंपन्यांचे सुपर मार्केटस् आहेत. वस्तुत: सोलापुरात सुपर मार्केट ही संकल्पना खूप पूर्वीच राबविण्यात आली.

ज्येष्ठ दिवंगत नेते वि. गु. शिवदारे यांनी सुपर बाजार या शीर्षकाखाली असा व्यापार सहकारी तत्त्वावर सुरू केला होता. त्यानंतर साई सुपर मार्केटही ग्राहकप्रिय ठरले. डी - मार्ट आणि बिग बझारच्या आगमनानंतर शहरातील या स्थानिक सुपर मार्केटस्चाही विस्तार झाला. शहराच्या अनेक भागांमध्ये सुपर मार्केटस्चे जाळे वाढल्यानंतर किरकोळ किराणा दुकानांच्या व्यवसायावर मात्र परिणाम व्हायला लागला. लक्ष्मी मंडईतील किराणा मालाचे व्यापारी सलीम मैंदर्गीकर यांनी सांगितले की, आमच्या मंडईमध्ये किराणा मालाचे तीन मोठे व्यापारी आहेत; पण जसे शहरात मॉल्स सुरू झाले तसा आमचा व्यवसाय घटला आहे.

पूर्वीपेक्षा सध्या केवळ ५० टक्केच व्यापार होतो आहे. अक्कलकोट रस्त्यावरील शशिकला ट्रेडर्सचे रामेश्वर नरोळे यांनीही मोठ्या सुपर मार्केटस्मुळे व्यापारावर परिणाम झाल्याचे मान्य केले. ते म्हणाले की, ग्राहकांना स्किम्स् हव्या असतात. या मोठ्या कंपन्या ‘एकावर एक फ्री’ सारख्या स्किम्स् सहज देऊ शकतात. त्यामुळे ग्राहक तेथूनच माल घेणे पसंत करतो. होटगी रस्त्यावर वीरेश्वर पट्टणशेट्टी यांनी सांगितले की, सिंगल ब्रँडच्या मंजुरीमुळे दुकान चालविणेही मुश्किल होणार आहे. मोठ्या आंतरराष्टÑीय कंपन्यांच्या किरकोळ स्वरूपाच्या व्यापारामुळे भारतातील छोटे किरकोळ व्यापारी संपणार आहेत, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.-सुपर मार्केटस्ना पसंती का?

  • एकाच छताखाली वैविध्यपूर्ण उत्पादने उपलब्ध
  • खरेदीसाठी भरपूर सवलती
  • उत्कृष्ट पॅकिंगमध्ये माल उपलब्ध
  • काही सुपर मार्केटस्ची घरपोच सेवा
  • अगदी फळे आणि भाज्यांची खरेदी करणे शक्य
  • बिग बझारसारख्या मॉलमध्ये धान्य खरेदी करून दळून मिळण्याची सुविधा

-उद्योग व्यापार मंडळाची बैठकथेट परकीय गुंतवणुकीसाठी सिंगल ब्रँडला भारतीय उद्योग व्यापार मंडळ आणि ‘फाम’ने (फेडरेशन आॅफ असोसिएशन्स् आॅफ महाराष्टÑ) जोरदार विरोध केला आहे. या मंडळाचे सरचिटणीस आणि ‘फाम’चे उपाध्यक्ष पशुपती माशाळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सुपर मार्केटस्च्या जाळ्यामुळे देशातील  किरकोळ व्यापार निम्म्याने घटला आहे.

आता सिंगल ब्रँडला मंजुरी मिळाल्यामुळे सामान्य व्यापाºयांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. या स्थितीत केंद्राच्या निर्णयाला विरोध करण्याच्या उद्देशाने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी भारतीय व्यापार उद्योग मंडळ आणि ‘फाम’च्या पदाधिकाºयांची ८ जुलै रोजी नवी दिल्ली येथे बैठक होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारBig Bazaarबिग बाजार