शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

दररोज सलग बारा तास अभ्यासामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 5:29 PM

माझी प्रयोगशील शाळा...शिक्षणाचा सोलापुरी पॅटर्न;  उमाबाई श्राविका शाळेचा प्रयोगशील उपक्रम 

ठळक मुद्देउमाबाई श्राविका शाळेचा दहावीचा निकाल हा ९५ टक्के लागलामहापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून १२ तास अभ्यास उपक्रमाची सुरुवात करण्यात येतेदप्तराचे ओझे कमी होण्यासाठी प्रत्येक वर्गात पुस्तकासाठी कपाट ठेवण्यात आले आहे

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सलग १८ तास अभ्यास करत होते. त्यांच्याकडून मिळणाºया प्रेरणेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक सामाजिक संस्था, संघटना सलग १८ तास अभ्यास करण्याबाबत उपक्रम घेतात. उमाबाई श्राविका शाळेमध्ये फक्त त्याच दिवशी असा उपक्रम न घेता ६ डिसेंबर ते दहावीच्या परीक्षा संपेपर्यंत हा उपक्रम घेण्यात येतो. 

यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढली आहे. राज्यात दहावीच्या निकालाचा टक्का घसरला असताना उमाबाई श्राविका शाळेचा दहावीचा निकाल हा ९५ टक्के लागला आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून १२ तास अभ्यास उपक्रमाची सुरुवात करण्यात येते. शाळेतील तिन्ही तुकडीचे मिळून १६३ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात. अभ्यास सुरू असताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक समोर असतात. विद्यार्थ्यांना शंका असल्यास लगेच शिक्षकांकडून त्याचे निरसन करण्यात येते. दर दोन तासाला शिक्षक बदलतात. सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हा उपक्रम घेण्यात येतो. 

विद्यार्थ्यांना कंटाळा येऊ नये म्हणून त्यांना दुपारी जेवणाची मोठी सुट्टी देण्यात येते. दुपारी चार ते पाच असा एक तास क्रीडाशिक्षक मनोरंजनात्मक खेळ घेतात. त्यानंतर पुन्हा सायंकाळी पाच ते सातपर्यंत अभ्यास केला जातो. सायंकाळी सात वाजता मुलांना नेण्यास त्यांचे पालक येतात. या उपक्रमास पालकांचे सहकार्य असल्याने यास यश मिळत आहे.

दप्तराचे ओझे कमी होण्यासाठी प्रत्येक वर्गात पुस्तकासाठी कपाट ठेवण्यात आले आहे. नवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून प्रत्येक वर्ग हा ई-क्लास करण्यात आला आहे. प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयाची माहिती दिली जाते. संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा विद्युल्लता शहा, संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा व विश्वस्त हे विविध उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शन करतात. 

आचार्य शांतीसागर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन- उमाबाई श्राविका संस्थेत ६० वर्षांपासून दरवर्षी स्वर्गीय आचार्य शांतीसागर महाराज स्मृतिदिनानिमित्त शांतीसागर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. हा उपक्रम अखंडपणे चालू आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून प्रशालेत दररोज पुस्तकाचे प्रकट वाचन घेतले जाते. त्याचबरोबर त्यांना संस्कारक्षम गोष्टी सांगितल्या जातात. स्व. हिरुबाई नेमचंद मुक्तद्वार ग्रंथालयामार्फत ‘ग्रंथालय आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जातो. 

आज स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थी सक्षमपणे ज्ञान संपादन करून समाजातील एक सुसंस्कारीत नागरिक घडविण्याचे पवित्र कार्य आमची शाळा व शिक्षक करत आहेत. नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये आमची प्रशाला नेहमी अग्रेसर असते. आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव व्हावा, हा प्रशालेचा मानस आहे. - प्राचार्य सुकुमार मोहोळेउमाबाई श्राविका माध्यमिक विद्यालय, सोलापूर.

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा