याबाबत सोलापूर गुन्हे विभागाचे सहायक फौजदार नीलकंठ जाधवर यांनी तालुका पोलिसात तक्रार देताच चालक सयाजी मारुती गाडेकर (वय २७ रा. पानगाव) याच्याविरुद्ध भादंवि ३७९, पर्यावरण संरक्षण कायदा कलम ९ व १५ नुसार गुन्हा नोंदला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उंडेगावजवळील भोगावती नदीच्या पात्रातून कोणतीही शासकीय रॉयल्टी न भरता टेम्पो (डीएस १०८००४) २ ब्रास वाळू घेऊन विक्रीसाठी बार्शीकडे येत होता. त्यावेळी हे पथक पेट्रोलिंग करत या गावाजवळ येताच त्यास या पथकाने अडवले. महसूल विभागाचा परवाना नसल्याने पथकाने १२ हजार रुपयांच्या वाळूसह ५ लाख १२ हजाराचा मुद्देमाल जप्त करून त्यास ताब्यात घेतले.
ही कारवाई फौजदार अनिल पाटील, सहाय्यक फौजदार शिवाजी घोळवे, हवालदार प्रकाश कारटकर, केशव पर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस नाईक महेश डोंगरे करत आहेत.