२५ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सांगोला शहरातील स्टेशनवरील एस. एस. कम्युनिकेशन या मोबाईल शॉपीचे शटर गॅस कटरने तोडून आतील १० लाख ६९ हजार ४४ रुपयांचे मोबाईल व रोख १ लाख ६२ हजार रुपयांची रोकड असा १२ लाख ३१ हजार ४४ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याबाबत विजय राऊत यांनी २६ जानेवारी रोजी सांगोला पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.
त्यानुसार सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, फौजदार अमित सिद-पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने पुणे, मुंबई, सांगोला व आजूबाजूच्या भागांमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ३३ मोबाईल व एक टॅब असा ६ लाख ८ हजार ८३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश गायकवाड, पोलीस हवालदार विजय भरले, पोलीस हवालदार मोहन मनसावले, पोलीस नाईक रवी माने, पोलीस नाईक हरी पांढरे, पोलीस सचिन गायकवाड, अरुण केंद्रे, सचिन मागाडे, सायबर शाखेचे पोलीस रवी हाटखिळे यांनी केली.