सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात दोन मृत्यू झाले तरी संपकार्तील लोकांच्या चाचण्या का केल्या नाहीत, याबाबत चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी सोमवारी दिले आहेत.
ग्रामीण भागात पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण संशयित रुग्णांची तपासणी सुरूच ठेवा असे आदेश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे पंढरपूर, बार्शी, करमाळा, सांगोला, मंगळवेढा तालुक्यात चाचण्या सुरू आहेत. पण गेल्या आठवड्यात उत्तर सोलापूर आणि त्या खालोखाल अक्कलकोट, करमाळा, दक्षिण सोलापुरात चाचण्या कमी दाखविण्यात आल्या आहेत.
उत्तर सोलापूर तालुक्यात दोन मृत्यू झाले तरी संपकार्तील व्यक्तींचा शोध व चाचण्या का घेण्यात आल्या नाहीत असा सवाल मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी आरोग्य विभागाला विचारला आहे. चाचण्या कमी करणे ही बाब अतिशय गंभीर आहे. याला जबाबदार असणाºया अधिकाºयाला जाब विचारा अशी सूचना त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांना दिल्याचे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.काही ठिकाणी चाचण्या कमी झाल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे. पदभार घेतल्यापासून मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सर्व तालुका अधिकाºयांना चाचण्या वाढविण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. उत्तरच्या बाबतीत काय घडले याची चौकशी करू.डॉ. शीतलकुमार जाधव,जिल्हा आरोग्य अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद