ठळक मुद्दे- पंढरपुरात कोरोना व्हायरसबाबत शाळा, महाविद्यालयात जनजागृती- विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीकडून मंदिरात प्रत्येक तासाला स्वच्छता मोहिम- भाविकांच्या सुरक्षित आरोग्यासाठी मंदिर समितीकडून विविध उपाययोजना
पंढरपूर : कोरोना व्हायरसचा प्रतिबंधक उपाय म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या हातावर सॅनिटायझरचे दोन थेंब टाकण्यास मंदिर समितीने सुरू केली आहे.
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांची संख्या जादा आहे. राज्याच्या कानाकोपºयातून भाविक पंढरीत येतात. कोरोना हा आजार संसर्ग जन्य रोग आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरात येणाºया प्रत्येक भाविका च्या हातावर सॅनिटायझरचे थेंब टाकत आहे.
भाविकांच्या हातावर सॅनिटायझरचे थेंब टाकण्यासाठी नामदेव पायरी, व्हीआयपी गेट व पूर्व गेट या ठिकाणी दोन-दोन कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. त्याच बरोबर मास्काचे ही वाटप केले असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.