दोन गटांत झालेल्या मारहाणीनंतर सहायक पोलीस निरीक्षक वैभव मारकड व अन्य पोलीस घटनास्थळी धावले. तणाव वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली. रविवारी दिवसभर दोन गटांमध्ये दगडफेक होत होती. त्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त याठिकाणी लावला होता. शनिवार १ मे रोजी मध्यरात्री माळीनगर येथील सिद्धार्थनगर ते सवतगाव या रस्त्यावरची खडी काढून पाईपलाईन का टाकली या कारणावरून दोन गटामध्ये हाणामारी झाली. त्यामध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले. शिवाय एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अकलूज पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्यानंतर दोषींविरुद्ध कारवाई केली आहे. याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक वैभव मारकड हे करीत आहेत.
माळीनगरमध्ये दोन गटात मारहाण, १२ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 4:17 AM