याबाबतची अधिक माहिती अशी की, ढेंगळे गटाचे दिलीप अनंतराव ढेंगळे यांना शिवरस्ता करण्याच्या कारणावरून विष्णू बाबासाहेब कापसे, दिलीप बाबासाहेब कापसे, प्रमोद ढेंगळे, अरुण सुबराव कापसे (रा.जवळगाव) यांनी लोखंडी रॉड, लोखंडी पाइप व काठ्यांनी डोक्यावर व शरीरावर मारले. शिवीगाळ करीत मारहाण करून गंभीर जखमी केले अशी फिर्याद ढेंगळे यांनी दिली.
कापसे गटाने दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष अनंतराव ढेंगळे, दिलीप अनंतराव ढेंगळे, अनंतराव हरिश्चंद्र ढेंगळे, परमेश्वर आंबऋषी ढेंगळे, समाधान रावसाहेब ढेंगळे, संभाजी केरबा ढेंगळे यांनी गायरान जमीन खोदून स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदा शिव रस्ता तयार केला व पर्यावरणाचा ऱ्हास केल्याची तक्रार बार्शीच्या न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग कोर्ट -३ यांच्याकडे दाखल केली आहे. या प्रकाराचा राग मनात धरून लोखंडी रॉड, सत्तूर, काठ्यांनी मारहाण केल्याची फिर्याद कापसे गटाकडून दाखल झाल्याने सहा जणांविरोधात गुन्हा नोंदला आहे.
या प्रकरणात परस्पर दोन्ही गटाच्या फिर्यादी दाखल झाल्याने दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनय बहिर हे करीत आहेत.