सोलापूर - ज्येष्ठ समाजसेवक नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी पूर्तीचे औचित्य साधून बुधवारी शहर-जिल्ह्यात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. सकाळी ७ ते १२ या वेळेत ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये शहरातील ४६ सरकारी कार्यालयाच्या परिसरातून तब्बल २०० टन कचरा उलण्यात आला. यासाठी ४५०० श्री सदस्यांनी या मोहिमेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रभर महास्वच्छता अभियान राबवण्यात येते. यंदाही सोलापूर शहर जिल्ह्यात बुधवारी ही मोहीम राबवण्यात आली. शहरातील ४,५०० श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या मोहिमेसाठी १२ गटांमधून सदस्यांची विभागणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषद, महापालिका, न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्रामीण पोलीस मुख्यालय, शहर मुख्यालय, विमा हॉस्पिटल, तहसील कार्यालय, डीआरएम कार्यालय, सर्व पोलीस ठाणी, चौकी, बीएसएनल कार्यालय, बसस्थानक, आरटीओ, पासपोर्ट कार्यालय, शासकीय विश्रामगृह, आजकर विभाग, सिंचन विभाग अशा सोलापुरातील नऊ मार्गावर ही महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, गावांमध्ये २० हजाराहून अधिक श्री सदस्य उत्स्फूर्तपणे एकवटले. नानासाहेब प्रतिष्ठानचे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी, डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.
कोणाच्याही सूचनेविना शिस्तीत मोहीममोहीम सुरळीत पार पाडण्यासाठी १२ गटात विभागणी करुन स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. कोणाच्याही सूचनाविना अगदी शांततेत प्रत्येक सदस्यांनी स्वत:हून कचरा उचलून स्वच्छता मोहिमला हातभार लावला.
जय सद्गुरु हीच ओळखस्वच्छता मोहिम राबवताना यातील कोणीही आपले नाव अथवा ओळख न सांगता हात जोडून ‘जय सद्गुरु’ हीच आपली ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.