पंढरपूर : शहरातील मोबाईल विक्रीची दोन दुकाने चोरांनी मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास फोडली तर आणखी एक मोबाईल दुकान फोडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये अंदाजे तीन ते चार लाख रुपयांचे मोबाईल व मोबाईलचे इतर साहित्य चोरीला गेले आहे. शहरातील शहा पेट्रोल जवळील अनेक मोबाईल दुकाने आहेत. त्या ठिकाणची शाहरुख मणेरी ( रा. तांबोळी वस्ती, देगाव, ता. पंढरपूर) एस एम मोबाईल शॉपी व महेश साळुंखे ( रा. सेंट्रल नाका, पंढरपूर) या दुकानाचे शटर उचकटून चोरांनी आत प्रवेश केला आहे.
एस एम मोबाईल शॉपीमधील अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे मोबाईलचे नेहाले होते. तर विठ्ठई मोबाईल शॉपीमधील अंदांजे ५० हजार रुपये किंमतीचे मोबाईलचे साहित्य चोरून नेहले आहे. तर सोहम कांबळे ( रा. पेहे, पंढरपूर) यांच्या सेल सेंटर मोबाईल शॉपी या दुकानात चोरीचा प्रयत्न झाला आहे या दुकानात अंदाजे ४ ते ५ लाखाचा मोबाईल व इतर साहित्य होते. चोरांचा प्रयत्न अयशस्वी ठरला यामुळे सोहम कांबळे यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. पोलिसांनी घटना स्थळी भेट देऊन माहिती घेणे सुरू केले आहे.