पोलीस निरीक्षक पवार तीन महिन्यांपूर्वी रुजू झाले होते. काही पोलीस कर्मचाऱ्यांवर हेतुपुरस्सर कारवाईचे प्रस्ताव पाठवणे व आर्थिक व्यवहारात लुडबुड करणाऱ्यांना पाठीशी घालणे, यामुळे ही कारवाई केली असावी, अशी चर्चा पोलीस ठाण्यात सुरू आहे.
सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड हे अक्कलकोट तालुक्यातील रहिवासी असून, दक्षिण व उत्तर दोन्ही पोलीस ठाण्यांत काम केलेले आहे. नुकतीच शिवाजी नगर तांड्यावरील घटनेची झळ त्यांनाही बसल्याची चर्चा आहे.
---
अशीही चर्चा सुरू
दक्षिण पोलीस ठाण्यात काही वर्षांपासून असलेले पोलीस नाईक प्रभारी अधिकाऱ्यांचे अघोषित मार्गदर्शक होते. यामुळे तत्कालीन पोलीस निरीक्षक काही घटनांमध्ये अडचणीत आले होते, अशीही चर्चा सुरू आहे. कोळी यांच्या विरोधात दोन गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आल्याने त्यांना तत्काळ मुख्यालयाला रुजू होण्याचे आदेश निघाले. तसेच नॉर्थ ठाण्याचे पोलीस हवालदार महादेव चिंचोळकर यांनी एका दरोड्यातील गुन्हा कर्नाटक राज्यात जाऊन केवळ बारा दिवसांत उघडकीस आणला होता. लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. अशा कर्मचाऱ्यांचाही मुख्यालयाला बदलीचे आदेश निघाल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.
----