बार्शी (जि. सोलापूर) : कंटेनर आणि खासगी प्रवासी बसची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले, तर बसमधील १५ जण जखमी झाले. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी पहाटेच्या दरम्यान बार्शी-कुसळंब मार्गावरील गॅस पंपासमोर हा अपघात घडला.रमेश सुदाम गंभीरे (वय २८, रा. वागदरी, ता. रेणापूर, जि. लातूर) आणि शिवमूर्ती बिभीषण कांबळे (वय २२, रा. गुंजरगाव, ता. निलंगा, जि. लातूर) अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत. या अपघातात अक्षता भालके (वय २२), अंकुश उमाटे (वय ३६), योगिता जाधव (वय २७), नीलकंठ राचुरे (वय ३५), गफूर माखेनदार (वय ६५), विठ्ठल सोलंकी (वय ७५), लक्ष्मण करपे (वय ६२), शालिनी सूर्यवंशी (वय २१), नागनाथ सुरवसे (वय ३२), योगेश सराफ (वय २६, रा. लातूर), पार्वती भेलारे, योगिता पंचाळ (वय १०), श्याम पंचाळ (वय ४०), आदित्य पंचाळ (वय १२), स्वरूपा पंचाळ (वय ७, रा. सर्व जण कलंदर, जि. लातूर) हे जखमी झाले. जखमींना बार्शीच्या जगदाळेमामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.याबाबत अधिक माहिती अशी, प्रियांका टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सची बस रविवारी रात्री लातूरहून पुण्याकडे निघाली होती. कुसळंब रस्त्यावरील गॅस पेट्रोलपंपाजवळ बसची समोरून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक बसली. धडक इतकी जोराची होती की त्या आवाजाने पेट्रोल पंपावरील कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी बसमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले.
कंटेनर-बस अपघातात लातूर जिल्ह्यातील दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 3:43 AM