कुर्डूवाडी : पंढरपूर रस्त्यावर लऊळजवळ समोरील दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात कार पलटी होऊन दोघे गंभीर जखमी झाले.
पंढरपूर रस्त्यावर लऊळ गावापासून एक किलोमीटर अंतरावर एका पेट्रोल पंपासमोर मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात प्रशांत रमेश माने (वय २३, रा. मळोली, ता. माळशिरस) व दीपक थोरात (वय ३०, रा. देवडी, ता. मोहोळ) हे दोघे जण गंभीर जखमी झाले.
अपघातातील कार ही भरधाव वेगात पंढरपूरकडून कुर्डूवाडीकडे येत होती. पेट्रोल भरण्यासाठी ही कार (एमएच-१०, सीएक्स-५५३२) अचानक पंपाकडे वळाली. इतक्यात समोर दुचाकीवरील व्यक्तींना वाचविण्याच्या नादात हॅणचड ब्रेक मारला. यावेळी कार पलटी होऊन दोघे जण जखमी झाले. कारने तीन-चार कोलांट्या घेतल्या.
---
कार झाली चक्काचूर
हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. गाडीत असणारे दोघे जण हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना अंबुलन्सद्वारे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नातेवाइकांनी त्यांना अकलूज येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत कुर्डूवाडी पोलिसांत या घटनेची नोंद झालेली नव्हती.
---
फोटो : ०२ कुर्डूवाडी ॲक्सिडेंट
लऊळजवळ कार पलटी होऊन चक्काचूर झाली. या अपघातात दोघे जण जखमी झाले.