सोलापूर : सोमवारपासून जिल्ह्यात कृत्रिम पावसाच्या शास्त्रीय प्रयोगाला सुरुवात होत आहे. होटगी रोडवरील विमानळावरुन पहिले विमान ढगांचा आढावा घेण्यासाठी तर दुसरे ढगांमध्ये कॅल्शियम क्लोराईडची फवारणी करण्यासाठी उड्डाण घेईल. सप्टेंबरअखेर हा प्रयोग सुरू राहणार असल्याचे आयआयटीएमच्या प्रकल्प संचालक तारा प्रभाकरन यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
तारा प्रभाकरन म्हणाल्या, आयआयटीएमने २०१८ मध्ये हा प्रयोग केला होता. आता पुन्हा हा प्रयोग केला जात आहे. आयआयटीएमने केगाव येथील सिंंहगड इन्स्टिट्यूट आणि तुळजापूर येथील तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये रडार बसविले आहेत. त्यामाध्यमातून २०० किमी त्रिज्येच्या क्षेत्रात ढग आणि पावसाचे निरीक्षण केले जाते. यासाठी सोलापुरात एक सेंटर उभारण्यात आले आहे. रडारच्या माध्यमातून दर दहा मिनिटाला वातावरणाचा अंदाज येतो. ढगांची स्थिती लक्षात घेऊन सिडींग केले जाते. या प्रकल्पासाठी २५ जणांचे पथक कार्यरत आहे.