मोहोळ : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झीरो म्हणून खासगी काम करणार्या दोन कामगारांना (दलाल) ४०० रुपयांची लाच स्वीकारताना सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून कार्यवाही केली. या दोघांविरुध्द रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.मोहोळ तालुक्यातील लमाणतांडा येथील अज्ञात तक्रारदाराने सन २०१० मध्ये खरेदी केलेली अडीच एकर शेतजमीन दुसर्या इसमाने खरेदी केली. एकच जमीन दोन जणांनी खरेदी केली म्हणून त्यांची साक्षांकित कागदपत्रे मागणी केली असता दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व कामे पाहणारे खाजगी व कर्मचारी तुपसमिंदर व गायकवाड यांनी १४०० रुपये लाच मागितली, त्याच दिवशी एक हजार रुपये देण्यात आले.उर्वरित ४०० रुपये आज नऊ मे रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले आहे. परंतु रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झाला नाही. -------------------------------------------दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्येक कामाचे पैसे स्वीकारण्यासाठी व प्रत्येक कामासाठी हेच झीरो कर्मचारी काम करीत असतात. ऑफिसमधील सर्व कागदपत्रे देण्याचे, काढण्याचे अधिकार हेच झीरो कर्मचारी करीत असतात. या कर्मचार्यांमार्फत स्वीकारले जाणारे पैसे हे स्थानिक व वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत पोहचविले जातात.
दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन दलालांना लाच घेताना पकडले
By admin | Published: May 09, 2014 9:13 PM