सोलापूर : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर व सुरक्षिततेच्या कारणास्तव सोलापूर विभागांतर्गत येणाºया सर्वच रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी आॅपरेशन नेमप्लेट अभियान राबविले़ या अभियानांतर्गत मंडलातील सर्वच रेल्वे स्थानक परिसराची तपासणी केली़ या तपासणीत २०७ दुचाकी वाहने बेवारस अवस्थेत सापडल्याची माहिती सुरक्षा आयुक्त मिथुन सोनी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली़
७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सुरक्षितता कायम राहावी यादृष्टीने सर्वच विभाग सतर्क आहेत. मध्य रेल्वेच्या मुुंबई विभागातून आलेल्या सूचनेनुसार सोलापूर मंडलातील साईनगर शिर्डी, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, भिगवण, कुर्डूवाडी, पंढरपूर, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, होटगी, कलबुर्गी, शहाबाद आणि वाडी रेल्वे स्टेशनच्या परिसरातील पार्किंगची ठिकाणे व अन्य परिसराची पाहणी करून तपासणी केली. या तपासणीत २०७ दुचाकी वाहने बेवारस अवस्थेत सापडली़ या बेवारस गाड्यांची माहिती जमा करून संबंधित दुचाकीस्वाराकडून ४२ हजार ५० रूपयाचा दंड आरपीएफ पोलिसांनी वसूल केला.
अशी झाली कारवाई....
- - वाहन मालकाविरूध्द रेल्वे अॅक्ट कलम १५९ अन्वये ६४ वाहनांवर कारवाई केली़
- - ज्या वाहन मालकाचा तपास लागलेला नाही अशा ५ गाड्या वाहन स्थानकामधील एल़पी़ ओ मध्ये जमा करण्यात आली आहेत़
- - ज्या वाहन मालकाचा तपास लागलेला नाही अशी १९ वाहने रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस स्थानकात जमा केली़
- - याशिवाय मोटार वाहन कायदा अंतर्गत ८८ वाहनांवर कारवाई करून वाहतूक पोलिसांनी २८ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल केला़
- - तिकीट न काढता रेल्वेस्थानक परिसरात अडथळे ठरणाºया ३१ वाहनधारकांकडून ९ हजार ३५० रूपयांचा दंड वसूल केला़
रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढविली- मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलात आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेत वाढ केली आहे. स्थानक परिसरात दिसणाºया संशयित प्रवाशांची आरपीएफ पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. याशिवाय स्थानिक पोलिसांच्या मदतीने डॉग स्कॉडव्दारे स्थानकावरील प्रत्येक ठिकाणाची तपासणी सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत रेल्वेस्थानक परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
कलम ३७० रद्द केल्यानंतर देशात सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. शिवाय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर काही रेल्वे स्थानकावर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे़ सोलापूर मंडलातील आरपीएफचे पोलीस सतर्क असतात़ त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे़ सोलापूर मंडलात हाय अलर्ट वगैरे काही नाही, मात्र आम्ही सर्वतोपरीने दक्ष आहोत़- मिथुन सोनी, विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा बल