पोलीस सूत्रांनुसार लताबाई दगडू आगलावे (वय ७०, रा. पोखरापूर) या १५ जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान पोखरापूर येथून मोहोळकडे येणाऱ्या वाहनांची वाट बघत थांबल्या होत्या. त्यावेळी एका दुचाकीवरून अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला. मी मोहोळला चाललो आहे, चला गाडीवरून सोडतो, असे सांगून वृद्धेला गाडीवर बसवले. वडळवला सोडण्याऐवजी थेट वैराग येथे आणले. त्यानंतर वृद्धेने त्या इसमाला तू मला इकडे कशासाठी आणले आहे, असे विचारले असता, त्याने सांगितले की वैराग ते सोलापूर जाणाऱ्या रोडवर एक मंदिर आहे. त्या मंदिराचे दर्शन घेऊन तुम्हाला वडवळ या ठिकाणी सोडतो म्हणून सोलापूर रोडच्या बाजूस असलेल्या नागनाथ मंदिराजवळ गाडी थांबवली.
त्यानंतर जवळ असलेले लिंबूपाणी दिले. लिंबूपाणी पिल्यानंतर वृद्धेला गुंगी आली व तेथेच झाडाखाली झोपली. थोड्या वेळाने जाग आल्यानंतर दागिने, मोबाइल व पैसे घेऊन अज्ञात इसम घेऊन पळून गेल्याचे लक्षात आले. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जाणा- येणाऱ्या लोकांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तेथील नागरिकांनी संबंधित वृद्धेला महिलेला सोलापूरच्या एसटीमध्ये बसून पाठवले.
याप्रकरणी कांताबाई आगलावे यांनी अनोळखी इसमाविरोधात तीस हजार रुपयांचे सोन्याचे गंठण रोख तीन हजार रुपये व दीड हजार रुपयांचा मोबाइल असा एकूण ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल दिली असून, अधिक तपास पोलीस नाईक विजयकुमार माने करीत आहेत.