सांगोला : भरधाव वेगातील कारची धडक बसून दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना महुद-पंढरपूर रोडवरील गार्डी फाट्यानजीक घडली. या अपघातात अन्य एक जण जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अमोल नवनाथ लवटे (वय २५, रा. महुद, ता. सांगोला) असे अपघातात मरण पावलेल्याचे नाव असून गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास महुद-पंढरपूर रोडवर गार्डी फाट्यानजीक हा अपघात झाला.
अमोल नवनाथ लवटे आणि त्याचा साथीदार असे दोघे जण मिळून बांधकामाचे साहित्य आणण्यासाठी गुरुवारी दुपारी चारच्या दरम्यान एका दुचाकी (एमएच ४५, क्यू ७०९८) वरून महुदहून पंढरपूरला निघाले होते. हे दोघे जण गार्डी फाट्याजवळ येताच समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कारची (एमएच ०४- ईएक्स-८९१) दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. अपघातात अमोल लवटे यांच्या डोक्यास गंभीर इजा होऊन तो जागीच ठार झाला. त्याचा साथीदार हा गंभीर जखमी झाला असून त्यास उपचाराकरता पंढरपूर येथे हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत जयवंत पांडुरंग लवटे (रा. महुद) यांनी फिर्याद दिली असून तपास सहायक फौजदार संजय राऊत करीत आहेत.
---
२२ अमोल लवटे