सोलापूर : कंटेनरने धडक देऊन डोक्यावरून चाक गेल्याने मार्केट यार्ड चौकात आणखी एका महिलेचा बळी गेला़ ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली़ वैशाली केदार बिराजदार (वय ३६, रा. योगीनाथनगर, शेळगी) असे या महिलेचे नाव आहे़
रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान केदार बिराजदार व त्यांची पत्नी दुचाकीवरून मुलीला शिकवणीच्या वर्गातून ही महिला घरी घेऊन जात होती़ रस्त्याच्या बाजूला सिग्नलशेजारी हे तिघे थांबले असताना हैदराबादकडून पुण्याला जाणाºया भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिली. यात केदार बिराजदार आणि मुलगी बाजूला फेकले गेले तर वैशाली बिराजदार यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यात ती गंभीर जखमी झाली. अन्य जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मार्केट यार्ड चौकात चारही बाजूला फळविक्रेत्यांची वर्दळ असल्याने वाहतुकीला नेहमीच अडथळा निर्माण होतो. शिवाय रिक्षांचीही गर्दी मोठी असते. या गर्दीवर कोणाचेच नियंत्रण नसते. पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.
मृत महिला अर्धा तास रस्त्यावर पडूनअपघातानंतर वैशाली बिराजदार सुमारे अर्धा तासापेक्षा अधिक वेळ तशीच पडून होती. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी हलवण्याची तसदी कोणीच घेतली नाही. नातेवाईकांनी स्वत: उचलून मार्कंडेय सहकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तोपर्यंत सगळे संपले होते. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत महिला वैशाली बिराजदार या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे यांच्या भगिनी आहेत.